परिसीमन विधेयकाच्या निमित्ताने इंडिया आघाडीमध्ये निर्माण झालेले मतभेद आणि शरद पवार गटाने बैठकीकडे फिरवलेली पाठ, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. “डिलिमिटेशन हा देशाच्या हिताचा चांगला निर्णय असून, केवळ सत्ता
.
काँग्रेसची ‘बौद्धिक दिवाळखोरी’ समोर येतेय
विखे पाटील यांनी काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस सत्तेवर असताना त्यांच्याच काळात डिलिमिटेशन झाले होते. मात्र, आज सत्ता नसल्याने ते सोयीप्रमाणे विरोध करत आहेत, त्याला फारसे समर्थन मिळणार नाही. दुर्दैवाने काँग्रेसकडे कोणतेही ठोस धोरण नाही. त्यांचे नेते देशापेक्षा विदेशात जाऊन देशावर टीका करतात, यातून त्यांची बौद्धिक दिवाळखोरी प्रत्येक वेळी समोर येते.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक घटक एनडीएसोबत येत असल्याने देशातील सध्याचे वातावरण पाहता काँग्रेस पूर्णपणे एकाकी पडेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

शरद पवार गटाच्या भूमिकेवरही भाष्य
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चांवरून इंडिया आघाडीत नाराजी आहे. तसेच, जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली असली, तरी इतर नेते हातचे राखून बोलत असल्याने आता केवळ औपचारिकता बाकी आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर विखे पाटील म्हणाले की, “हा पूर्णपणे त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्यात काय मतभेद आहेत किंवा त्यांनी काय निर्णय घ्यायचा, हे तो स्वतंत्र पक्ष स्वतः ठरवेल.”
दुष्काळ आणि नदीजोड प्रकल्पावर भाष्य
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नदीजोड प्रकल्पांच्या फायद्याबाबत विचारले असता विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा उल्लेख केला. भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नळगंगा-वैनगंगा प्रकल्पासह दोन मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
—————–
हेही वाचा..
दावा- शरद पवारांची राष्ट्रवादी परिसीमन विधेयकाला पाठिंबा देणार: सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री होण्याची चर्चा; काँग्रेस म्हणाली- शरद पवारांना आम्ही राज्यसभेवर पाठवले

शरद पवारांचा पक्ष NCP (SP) परिसीमन विधेयकावर केंद्र सरकारला पाठिंबा देणार आहे. पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याला दुजोरा दिला आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.दरम्यान, एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पाठिंब्याच्या बदल्यात NCP (SP)च्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री करण्यात येणार आहे. याशिवाय पक्षाने राज्य सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद आणि दोन राज्यमंत्रिपदेही मागितली आहेत. महाराष्ट्र विधानसभेत पक्षाचे 10 आमदार आणि लोकसभेत 8 खासदार आहेत. संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून लोकसभेत आणि 2 डिसेंबरपासून राज्यसभेत सुरू होणार आहे. सविस्तर वाचा