Headlines

रामदास कदमांना ऑडिओ क्लिपची तारीख कशी माहीत झाली?:क्लिप एआयची नाही, रेकॉर्डिंग खरी आहे; सत्य लपवू नका, कदमांच्या कॉल डिटेल्सची चौकशी झाली पाहिजे – मनोज जरांगे




एकनाथ शिंदे यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ती ऑडिओ क्लिप कधीची आहे, याची तारीख जाहीर केली. त्यांना ही तारीख कशी काय माहिती झाली? रामदास कदम आणि त्यांचा मुलगा लोकांना संभ्रमात टाकत असून ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. कदमांकडे ही तारीख आली कशी? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा छडा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लावला पाहिजे, असे ते म्हणाले. मनोज जरांगे म्हणाले की, रामदास कदम खूप उतावळे झाले आहेत. मी त्यांना ‘भाई’शिवाय कधीच बोललो नाही. रामदास कदम आणि नारायण राणे यांचा मी आदर करतो. शिंदेंना बदनाम करण्याचा माझा कोणताही डाव नाही, मात्र रामदास कदमच त्या ऑडिओ क्लिपची तारीख जाहीर करत आहेत. त्यामुळे कदम शिंदेंच्या सोबत आहेत की भाजपसोबत, असा प्रश्न पडतो. जर मला 500 कोटी रुपये दिले असतील, तर माझ्या मराठा बांधवांसमोर ते जाहीरपणे सांगितले पाहिजे. आपापसात चर्चा करणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे की तुम्ही पैसे दिलेच असे कसे म्हणालात? असेही जरांगे यांनी म्हटले आहे. क्लिप एआयची असल्याचा दावा फेटाळला मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता कोणीही असे म्हणू नये की ही क्लिप एआयची किंवा खोटी आहे. ज्या वेळची ही क्लिप आहे, त्या वेळी एआय इतके चांगले काम करत नव्हता. ती क्लिप एआयची नाही. ही रेकॉर्डिंग पूर्णपणे खरी आहे, त्यामुळे तुमचे लोक वाचवण्यासाठी क्लिप खोटी आहे असे सांगणे बंद करा. प्रत्येक वेळी अशा लोकांना पाठिशी घातले, तर ते तुम्हालाच महागात पडेल. या प्रकरणी आम्ही सरकारला हवी ती मदत करायला तयार आहोत, पण या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. मराठा आंदोलन चिरडण्यासाठी खरेच पैसे दिलेत का? हे सत्य समोर आलेच पाहिजे. यांच्या संपर्कात कोण आहे आणि या प्रकरणात नेमका कोण सहभागी आहे, हे आम्ही लवकरच समोर आणणार आहोत, असा इशारा जरांगे यांनी दिला. कदमांच्या कॉल डिटेल्सची चौकशी व्हावी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, रामदास कदम यांनी क्लिपची तारीख सांगितली, त्यामुळे त्यांना ती कोणी पुरवली याचा शोध घेतला पाहिजे. आम्हालासुद्धा ती तारीख माहिती नव्हती, पण रामदास कदम यांनी ती तारीख वाचून दाखवली. आमच्याविरोधात कोण षडयंत्र रचत आहे, हे आता उघडे पडले आहे. मी पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच ती क्लिप माध्यमांकडे कशी आली आणि रामदास कदम यांच्याकडून ती तारीख कशी सांगण्यात आली, हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या लक्षात येत नाही का? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. गृहमराज्यमंत्रीपदाचा गैरवापर करणार का? मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उदय सामंत म्हणतात की प्रकरणाचा छडा लागला पाहिजे, पण रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या बोलण्याचा उद्देश लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आहे. कदम हे फडणवीस आणि शिंदेंपैकी कोणाचे नुकसान करत आहेत? रामदास कदम यांचे कॉल डिटेल्स तपासले गेले पाहिजेत, त्यांना नेमकी तारीख कशी कळाली? गृहमराज्यमंत्रीपद आहे म्हणून काय आमच्या पोरांना अटक करणार का? एकनाथ शिंदेंना नेमके कोण बदनाम करत आहे, याचा शोध त्यांनी घेतला पाहिजे, असे सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *