Headlines

सुप्रिया सुळेंचा स्पाय पेन हा वेगळाच शोध:अदृश्य शक्तीचा तपास फक्त ताईच करू शकतात; महायुती 100 टक्के जिंकणार, संजय शिरसाट यांचा दावा




विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पार पडत असलेले मतदान, मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली ऑडिओ क्लिप आणि विरोधकांनी केलेले आरोप, या सर्व मुद्द्यांवर शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तरे दिली. “ही ऑडिओ क्लिप शिवसेना आणि भाजपमध्ये जाणीवपूर्वक संशय निर्माण करण्यासाठी आणली गेली आहे, त्यामुळे याची प्रामाणिक आणि फॉरेन्सिक चौकशी झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेत्यांवर त्यांनी कडाडून टीका केली. ‘ऑडिओ क्लिपमधून शिवसेना-भाजपमध्ये संशय निर्माण करण्याचा प्रयत्न’ मनोज जरांगे यांनी दाखवलेल्या ऑडिओ क्लिपबाबत शिरसाट म्हणाले, “आमच्या पक्षनेत्यांवर आणि त्यांच्या मुलावर झालेला आरोप आम्ही गांभीर्याने घेतला आहे. काल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली आहे. अडीच वर्षांनंतर ही क्लिप बाहेर का आली? याची चौकशी व्हायला नको का? शिवसेना आणि भाजपमध्ये संशय निर्माण करण्याच्या हेतूने जे कोणी हा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झालेच पाहिजे, यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.” भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ही क्लिप ‘एआय’ जनरेटेड असल्याचा दावा केल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “काहीही असू द्या, आम्ही या क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करा, असेच सांगत आहोत.” ‘संजय राऊत केवळ लोकांची करमणूक करतात’ ५०० कोटींच्या मुद्द्यावरून ईडीने चौकशी करावी, या संजय राऊत यांच्या मागणीवर शिरसाट यांनी जोरदार पलटवार केला. “एकेकाळी याच संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर २००० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. त्याचे पुढे काय झाले? त्यामुळे काहीही बोलून टाईमपास करणे आणि लोकांची करमणूक करणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या डोक्यात काय चाललेय, हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही,” असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेस नेत्यांवर बोचरी टीका ५०० कोटींच्या ऑडिओ पुराव्यावरून उपमुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना अटक करावी, या काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या मागणीवर शिरसाट संतापले. “सपकाळ डोक्यावर पडलेला माणूस आहे. अशा ऑडिओ क्लिपवर जर गुन्हे दाखल व्हायला लागले, तर जेलमध्ये जागा पुरणार नाही. गोष्टीची शहानिशा झाल्यानंतरच कारवाई होत असते,” असे ते म्हणाले. ‘अदृश्य शक्तीचा तपास सुप्रियाताईच करू शकतात’ पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटण्यासाठी ‘स्पाय कॅम’ असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावर शिरसाट म्हणाले, “तुम्ही एखाद-दोन जणांना पकडले तर चौकशी होईल. कुणाला पकडलेच नाही तर अदृश्य शक्तीच्या चौकश्या लावायच्या का? अदृश्य शक्तीचा तपास करणे ही शोधमोहीम फक्त सुप्रियाताईच राबवू शकतात. पराभव दिसत असल्याने असे आरोप करणे, हा पदवीधर मतदारांचा अपमान आहे.” ‘विधान परिषदेच्या पाचही जागा महायुती जिंकणार’ आज पार पडत असलेल्या विधान परिषदेच्या मतदानाबाबत विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले, “महायुतीने ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले असून, आमचे काही छोटे-मोठे वाद मिटले आहेत. याउलट महाविकास आघाडीमध्ये बेबनाव आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचा शंभर टक्के विजय निश्चित आहे.” ———————- हेही वाचा.. अडीच वर्षांनंतर ऑडिओ क्लिप बाहेर येण्यामागे हेतू काय?: फॉरेन्सिक चौकशीतून सत्य बाहेर काढणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा, स्पाय पेनवरून सुप्रिया सुळेंना टोला
राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान पार पडत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, पुण्यात भाजपकडून ‘स्पाय पेन’चा वापर होत असल्याच्या आरोपांवरून त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *