![]()
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या “वित्त आणि नियोजन’(अर्थ खाते) स्वतःकडेच राखण्यासाठी भाजप आणि ते पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) पडद्यामागे तीव्र संघर्ष सुरू आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या तिजोरीच्या चाव्या सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. आगामी २२ जून २०२६ च्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मूळ सत्तावाटपाचा हवाला देत राष्ट्रवादीने हे खाते परत मिळवण्यासाठी प्रचंड दबाव वाढवला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सध्या अर्थ खाते सध्यातरी माझ्याकडेच असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, “अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडे असणं यातच राज्याचं शहाणपण आहे. हा माझा अनुभव आणि आजचे राजकारण पाहून मी हे सांगतोय. या अनपेक्षित गुगलीवर फडणवीस यांनी हे “अंतिम’ प्रमाणपत्र आहे, ज्याची मला आवश्यकता होती. आता आणखी कुठली कुठली प्रमाणपत्रं घ्यायला लावताय तुम्ही?’ असेही ते मश्किलपणे म्हणाले.
Source link
राष्ट्रवादीचा अर्थ खाते परत मिळवण्यासाठी प्रचंड दबाव:मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले – सध्यातरी अर्थ खाते हे माझ्याकडेच