![]()
येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पांतर्गत संशोधित करण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टरचलीत स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित’ या उपयुक्त यंत्राल
.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या यंत्राच्या संशोधनात प्रकल्प प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड, डॉ. संजय भांगरे, डॉ. रवीकिरण राठोड आणि इंजि. रोहित गेठे या शास्त्रज्ञांच्या पथकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.हे यंत्र ५५ अश्वशक्ती (एचपी) किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रॅक्टरने सहज चालवता येते. स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित एकत्रित मशागत करत असल्याने पेरणीयोग्य जमीन अत्यंत कमी वेळेत तयार होते. एका तासात सुमारे ०.३३ हेक्टर क्षेत्रावरील मशागतीचे काम याद्वारे पूर्ण करता येते.
पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत या यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीच्या खर्चात तब्बल ४४ टक्क्यांपर्यंत मोठी बचत होते. एकत्रित मशागतीसाठी विकसित करण्यात आलेल्या या ‘ट्रॅक्टरचलीत फुले स्पेड नांगर’ यंत्राला राज्यस्तरीय संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या २०२५ च्या बैठकीत आधीच प्रसारित करून शिफारशीत करण्यात आलेले आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. एस.एन. झा, सहाय्यक महासंचालक डॉ. के.पी. सिंग, भोपाळचे संचालक डॉ. सी.आर. मेहता, संचालक डॉ. पी.एन. अग्रवाल तसेच विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी संबंधित शास्त्रज्ञांचे विशेष कौतुक केले आहे. या पेटंटमुळे कृषी विद्यापीठाच्या सर्वच स्तरातून संशोधकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.