![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील अवाडा (Avaada) सोलर प्रकल्पाला भेट दिल्यानंतर विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीवर टीका करताना, नागपुरातील उद्योगवाढ, अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रांची उभारणी, मुंबईतील पायाभूत सुविधा, समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित फ्रेट कॉरिडोर तसेच UPI व्यवहारांवरील शुल्क या मुद्द्यांवरही सविस्तर भूमिका मांडली. राहुल गांधींवर टीका राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली. “राहुल गांधींनी स्टँड-अप कॉमेडियनचे काम हाती घ्यावे. तिथे मिमिक्री केली तर त्यांना रोजगार मिळू शकतो. त्यांनी त्यांच्या पक्षालाच बेरोजगार करून ठेवले आहे,” असा टोला त्यांनी लगावला. अवाडा सोलर प्रकल्प देशासाठी महत्त्वाचा देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपुरातील अवाडाची सोलर मॉड्युल निर्मिती फॅक्टरी ही देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक प्रकल्पांपैकी एक आहे. येथे तयार होणारी स्मार्ट सोलर मॉड्युल्स देशाला जागतिक स्पर्धेत, विशेषतः चीनशी स्पर्धा करण्यास मदत करत आहेत. त्यांच्या मते, 2024 मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते आणि अल्पावधीतच येथे सुमारे 5,000 कामगारांना रोजगार मिळाला आहे. अवाडा कंपनीची उत्पादन क्षमता आगामी काळात 7 गिगावॅटपर्यंत वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बुटीबोरीत जमीन संपली, नव्या औद्योगिक क्षेत्राची तयारी नागपूर परिसरातील औद्योगिक विकासाचा उल्लेख करताना फडणवीस यांनी सांगितले की, अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये उपलब्ध असलेली बहुतांश जमीन उद्योगांनी घेतली असून नवीन गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे आणखी एक अतिरिक्त बुटीबोरी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिंद्रा कंपनीला सुमारे 1,000 एकर जमीन देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सावनेर परिसरात सुमारे 5,000 एकर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असून, तेथेही उद्योगांसाठी मोठी मागणी नोंदवली गेल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर होणार देशातील सर्वात मोठे सोलर हब अवाडासह आणखी तीन कंपन्या सोलर क्षेत्रात गुंतवणूक करत असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपूर देशातील सर्वात मोठे सोलर मॉड्युल उत्पादन केंद्र बनेल. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल आणि विदर्भातील औद्योगिक परिसंस्थेला चालना मिळेल. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोस्टल रोड, नॉर्थ कोस्टल रोड, बोगद्यांचे जाळे, विविध पूल, मेट्रो आणि बेस्ट सेवांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच उपनगरी रेल्वेमध्ये मेट्रोप्रमाणे आधुनिक डबे आणण्याची योजना पुढील दोन ते तीन वर्षांत राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट मॉडेलवर काम सुरू असून, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 10 ते 12 वर्षांचा कालावधी लागू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. समृद्धी महामार्गालगत फ्रेट कॉरिडोरची योजना राज्य सरकार वाढवण बंदर, जेएनपीटी, नाशिक, जालना, वर्धा आणि गडचिरोली यांना जोडणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट रेल्वे कॉरिडॉरचा अभ्यास करत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत यासाठी डीपीआर तयार केला जात आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामावेळी रेल्वेसाठी जागा राखून ठेवण्यात आली होती. या मार्गावर मालवाहतूक रेल्वे विकसित झाल्यास राज्यात पोर्ट-आधारित औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. UPI शुल्कावर पेट्रोल पंप चालकांचा विरोध अयोग्य UPI व्यवहारांवरील शुल्काच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पेट्रोल पंप चालकांनी मोठ्या व्यवहारांसाठी UPI स्वीकारणार नसल्याची भूमिका घेणे योग्य नाही. UPI मुळे व्यापार वाढला असून व्यवहार अधिक पारदर्शक झाले आहेत. त्यांनी सांगितले की, सर्व व्यवहारांवर शुल्क लागू नसून केवळ काही विशिष्ट व्यवहारांवरच नाममात्र शुल्क आहे. डिजिटल व्यवहारांमुळे भ्रष्टाचार कमी होण्यास मदत झाली असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. हेही वाचा… ‘दिशा सालियान प्रकरणात तपास यंत्रणा सत्य बाहेर आणतील’:छगन भुजबळांची पहिलीच प्रतिक्रिया; कुंभमेळ्यावरही दिली प्रतिक्रिया दिशा सालियान प्रकरणावरून राज्यातील अनेक नेते प्रतिक्रिया देत असून, तिचे वडील सतीश सालियान यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव घेत त्यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. सध्या सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून काहींनी थेट आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. या सर्व घडामोडींवर भाष्य करताना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून चौकशी करणाऱ्या संस्था त्यातील सत्य नक्कीच बाहेर आणतील. सविस्तर वाचा…
Source link
राहुल गांधींच्या मिमिक्रीवरून देवेंद्र फडणवीसांची टीका:नागपुरातील उद्योगवाढ, फ्रेट कॉरिडोर आणि UPI शुल्कावरही भाष्य