![]()
पुण्यात लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे हे सरकारच्या हातचे बाहुले बनले असून, आरक्षणाच्या प्रश्नाऐवजी राजकारणाला अधिक महत्त्व देत असल्याचा दावा हाके यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली. हाके यांनी जरांगे यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ दिला. “आम्ही भुमरे आणि शिरसाट यांना निवडून आणलं,” असे जरांगे यांनी म्हटले होते. यावरून जरांगे आरक्षणासाठी नव्हे, तर विशिष्ट पक्षासाठी काम करत असल्याची कबुलीच त्यांनी दिल्याचे हाके म्हणाले. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनामागील भूमिका संशयास्पद ठरत असल्याचा दावा त्यांनी केला. मी शिवसेना भवनात गेलो म्हणून जरांगे यांच्या पोटात का दुखते? ज्या मराठा समाजातील व्यक्तींचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले आहे, त्या प्रकरणांवर जरांगे बोलत नाहीत. त्याऐवजी ते काही नेत्यांची बाजू घेत असल्याचा आरोपही हाके यांनी केला. कास्ट व्हेरिफिकेशन समितीवर टीका करणे योग्य नाही, कारण ती कायद्याच्या चौकटीत काम करणारी यंत्रणा आहे, असेही हाके यांनी स्पष्ट केले. “मी शिवसेना भवनात गेलो म्हणून मनोज जरांगे यांच्या पोटात का दुखते? ते शिवसेना भवन त्यांच्या वडिलांचे कार्यालय आहे का?” असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. तसेच, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची सध्याची भूमिका योग्य वाटत नसल्याचे हाके म्हणाले, जरी त्यांनी यापूर्वी शिंदे यांना अनेकदा सांभाळून घेतल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट आणि अधिकृत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली. “आम्हाला कोणी मोजले नाही म्हणून आमचे आंदोलन थांबणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आता पर्दाफाश झाला असून, समाजाला सत्य समजू लागले आहे, असा दावा हाके यांनी केला. हेही वाचा.. उद्धव ठाकरेच बरे म्हणायची वेळ येईल!:कुणबी प्रमाणपत्रांवरून मनोज जरांगे आक्रमक, शिंदे-फडणवीस आणि बावनकुळेंवर गंभीर आरोप मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेली कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यांची जात वैधता (Validity) रद्द केल्याच्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. पत्रकार परिषदेत अत्यंत जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ‘मराठा समाजाचे वाटोळे करण्याचा कट’ रचल्याचा थेट आरोप केला आहे. पुराव्यांचे ढीग सोबत घेऊन आलेल्या जरांगे यांनी अनेक गौप्यस्फोट करत महायुती सरकारला आगामी निवडणुकीत सळो की पळो करून सोडण्याचा इशारा दिला आहे. सविस्तर वाचा
Source link
लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर आरोप:म्हणाले- जरांगे सरकारचे बाहुले बनले, आरक्षणाऐवजी राजकारण करत असल्याचा दावा