![]()
लखनऊ येथील शिवा शर्मा हत्याकांडात गेल्या ११ दिवसांपासून फरार असलेली मॉडेल श्रद्धा दुबे हिला नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (२० ऑक्टोबर) अटक केली. तिची बहीण रश्मी दुबे आणि चालक दानिश ऊर्फ तन्वीर अली यांनाही च
.
शिवा शर्मा यांच्या मृत्यूची घटना ९ ऑक्टोबरला लखनऊमधील हजरतगंज परिसरातील अवध ग्रीन अपार्टमेंटमध्ये घडली होती. चौथ्या मजल्यावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी आणि चालक दानिश हे तपास यंत्रणांच्या रडारवर आले. तपासादरम्यान आरोपी नेपाळमध्ये पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
आत्महत्या केल्याचा दावा
श्रद्धाने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्हिडिओंमध्ये शिवा यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला होता. आर्थिक अडचणींमुळे ते तणावात होते, असेही तिने म्हटल्याचे वृत्त आहे. मात्र, शिवा यांच्या कुटुंबीयांनी तिच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमकी घटना कशी घडली, मृत्यूमागे कोणाची भूमिका होती हे आता पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होईल.
मृत्यू की हत्या, याचा तपास
शिवा शर्मा यांच्या मृत्युप्रकरणी त्यांची आई रंजना शर्मा यांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवा यांचा मृत्यू अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने झाला असला तरी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मारहाण करून इमारतीवरून ढकलल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून पाहिल्या गेलेल्या घटनेचा तपास हत्येच्या दिशेने वळला.