Headlines

रात्रभर खुले राहिले मंदिर:साईनामाच्या गजरात पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस; दोन लाख भाविकांचे दर्शन!, अडीच तासांत दर्शन, 85 हजार भाविकांनी घेतला प्रसाद



साईनामाचा अखंड गजर, भक्तिरसात न्हालेली साईनगरी आणि दर्शनासाठी उसळलेला भाविकांचा महासागर अशा भक्तिमय वातावरणात श्री साईबाबांच्या १०८ व्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस उत्साहात साजरा झाला. या दिवशी सुमारे दोन लाख साईभक्तांनी समाधीचे दर्शन घेतले. मोठी

.

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दर्शनरांगेतील भाविकांसाठी पाणी, चहा, दूध, बिस्किटे आणि प्रसाद पाकिटांची व्यवस्था करण्यात आली होती. संस्थानच्या प्रसादालयात सुमारे ७० हजार, तर आराधना भोजनात १५ हजार भाविकांनी भोजनप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसरासह संपूर्ण शिर्डीत दिवसभर साईनामाचा जयघोष घुमत होता. पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी द्वारकामाईत सुरू असलेल्या श्री साईसच्चरित्राच्या अखंड पारायणाची सांगता झाली. त्यानंतर साईबाबांची प्रतिमा आणि साईसच्चरित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली.

संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी वीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी साईबाबांची प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यानंतर समाधी मंदिरात पाद्यपूजा करण्यात आली. लेंडीबाग येथे संस्थानचे अध्यक्ष शिवाजी कचरे आणि त्यांच्या पत्नी पद्मिनी कचरे यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले.

चित्रमय ठेव्यातून घडणार साईबाबांच्या कार्याचे दर्शन

दानशूर साईभक्त के. व्ही. रमणी यांनी साईबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित शंभरहून अधिक चित्रकृती संस्थानला दान दिल्या. या चित्रकृतींतून साईबाबांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि कार्याचे दर्शन घडणार असून त्या भाविकांसाठी श्रद्धा व साईचरित्राची ओळख करून देणारा ठेवा ठरणार आहेत.

नेपाळच्या भक्तांकडून चांदीचा मुकुट अर्पण

नेपाळमधील विराटनगर येथील साईभक्त डॉ. बिरेन्द्र कुमार बिस्ता आणि त्यांच्या परिवाराने श्री साईबाबांच्या चरणी ९७७ ग्रॅम वजनाचा भव्य चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. अत्यंत आकर्षक आणि सुबक रचना असलेल्या या चांदीच्या मुकुटावर सोन्याचा विशेष सुवर्णमुलामा देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *