Headlines

आरबीआयचा 77% सोन्याचा साठा देशातच:880.52 टन सोन्यापैकी680.05 टन भारतात, 11.10 लाख कोटींचे मूल्य




भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) एकूण ८८०.५२ टन सोन्यापैकी ६८०.०५ टन सोने देशातच ठेवण्यात आले आहे. हे प्रमाण सुमारे ७७ टक्के आहे. या सोन्याचे मूल्य ११ लाख १० हजार ४३८ कोटी रुपये आहे. उर्वरित १९७.६७ टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे सुरक्षित ठेवले आहे. आरबीआयने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे. आरबीआयने स्पष्ट केले की, ६८०.०५ टन सोने परदेशातून नव्याने भारतात आणले, असा याचा अर्थ नाही. ही ३१ मार्च २०२६ पर्यंतची साठवणुकीची स्थिती आहे. आरबीआयच्या डॉलर खरेदी-विक्री व्यवहारांचा निव्वळ परिणाम २०२३-२४ मध्ये ३ लाख ३९ हजार ५२८ कोटी रुपये होता. पुढील दोन वर्षांत तो कमी झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *