Headlines

Ashish Shelar Demands Probe Into Viral Audio Clip


“मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली कथित 500 कोटी रुपयांची ऑडिओ क्लिप पूर्णपणे खोटी, बनावट आणि तथ्यहीन आहे. भारतीय जनता पक्षाचा दामन पूर्णपणे साफ असून, या संभाषणाशी भाजपचा किंवा आमच्या कोणत्याही नेत्याचा काडीमात्र संबंध नाही. मनो

.

रवींद्र नाट्य मंदिर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी ऑडिओ क्लिप वाद, शिवसेना (शिंदे गट) नेत्यांमधील गैरसमज, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे ‘रेझिम चेंज’चे दावे, तसेच राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सांस्कृतिक कार्य विभागाने घेतलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली.

500 कोटींचा आरोप 100 टक्के असत्य; भाजपचा क्लिपशी संबंध नाही

जरांगे यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपवर भाजपची 5 कलमी अधिकृत भूमिका मांडताना शेलार म्हणाले, “या ऑडिओ क्लिपची सत्यता कुठेही सिद्ध झालेली नाही. आजकाल तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स डॉक्टर्ड केल्या जातात. ही क्लिपही तशीच बनावट असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.”

सखोल चौकशीची मागणी

“मनोज जरांगे यांनी चौकशीची मागणी केली आहे आणि भाजपही तीच मागणी करत आहे. मुख्यमंत्र्यांनी या संभाषणाची, हे संभाषण करणाऱ्यांची आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हे कोठून पसरवले गेले, या सर्वांची कायदेशीर चौकशी करावी. या कथित क्लिपमधील संभाषणाशी भारतीय जनता पक्ष 100 टक्के असहमत आहे. या व्यवहारात भाजपचा कोणताही संबंध नाही. या कथित प्रकरणात भाजपच्या एकाही वरिष्ठ अथवा जबाबदार नेत्याचा कोणताही सहभाग नाही.”

एकनाथ शिंदेंवर प्रश्न उपस्थित करणे अमान्य

“आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोणीही अशा प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते आम्हाला कदापि मान्य नाही. ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही’.”

शिवसेनेच्या नेत्यांमधील गैरसमज दूर करू

उद्योगमंत्री उदय सामंत आणि रामदास कदम यांच्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण देताना शेलार म्हणाले, “आमच्या मित्रपक्षाच्या काही नेत्यांनी यावर वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या मनात काही शंका किंवा गैरसमज निर्माण झाले असतील, तर आम्ही एकत्र बसून ते नक्की दूर करू. सार्वजनिक विधाने करताना सत्यता पडताळून पाहिली असती तर अधिक योग्य झाले असते; मात्र महायुतीमध्ये कोणताही तणाव किंवा दरी नाही.”

पुरावे असल्यास यंत्रणांकडे द्यावेत

“विरोधी पक्षनेते अंबादास दानवे किंवा इतर कोणाकडे जर काही पुरावे असतील, तर त्यांनी थेट तपास यंत्रणांकडे जावे. राज्यात कायद्याचे आणि संविधानाचे राज्य आहे. केवळ हवेत आरोप करून कोणालाही अटक करण्याची भाषा करणे हा बालिशपणा आहे.”

राज ठाकरेंना सिनेमाचे क्लायमॅक्स दिसतात

राज ठाकरे यांनी पुढील ५ महिन्यांत देशात सत्तापालट होण्याचा दावा केला होता, त्याचा समाचार घेताना शेलार म्हणाले, “ज्यांना रोज सिनेमे पाहण्याची सवय असते, त्यांना प्रत्यक्षातही सिनेमाचे क्लायमॅक्स, सीन्स आणि संवाद आठवतात. 2014 पासून देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएला प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या सत्तापालटाची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या कल्पनेला सत्याचा कोणताही आधार नाही.”

डॉक्युमेंट्रीचा उद्योग बदनामीसाठी

“क्लिपवरून आता डॉक्युमेंट्री आणि सिनेमांवर आले आहेत. पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्या मैत्रीवर डॉक्युमेंट्री बनवून केवळ बदनामीचे षड्यंत्र रचले जात आहे. अशा कपोलकल्पित गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. सत्य असेल तर यंत्रणांसमोर जावे, जनतेला संभ्रमित करण्याचे उद्योग बंद करावेत.”

टायगर श्रॉफची भेट आणि संजय राऊतांवर टीका

“टायगर श्रॉफ आणि त्यांच्या कुटुंबाशी माझे अनेक वर्षांचे व्यक्तिगत संबंध आहेत. ते माझ्या मतदारसंघातील मतदार आहेत आणि मुंबईचा पालकमंत्री या नात्याने त्यांची भेट घेणे माझे कर्तव्य होते. टायगर श्रॉफ आणि त्यांचा जखमी चालक वेगाने बरे होत आहेत. टायगर मनाने अत्यंत खंबीर आहे. बिश्नोई गँगचा संबंध आहे की नाही, याचा तपास पोलीस करत असून निष्कर्ष येण्याआधीच निष्कर्ष काढणारे मूर्ख आहेत.”

संजय राऊतांची बौद्धिक पातळी घसरली

“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. संजय राऊत यांची बौद्धिक पातळी इतकी घसरली आहे की त्यांची तपासणी ठाण्याच्या मनोरुग्णालयातच करावी लागेल.”

———————————————————

हेही वाचा…

माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना भाजपने पार्टी फंड पुरवला!: मनोज जरांगेंकडून 500 कोटींच्या दाव्याची स्फोटक ऑडिओ क्लिप जाहीर; शिंदे-फडणवीसांना षड्यंत्र थांबवण्याचा इशारा

“मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.