Headlines

लग्नात डिजेवर नृत्य केल्याच्या रागातून पत्नीची गळा चिरून हत्या:हत्येनंतर झाडाला गळफास घेत पतीचीही आत्महत्या, बोरगडी तांड्यात खळबळ




मेव्हण्याच्या लग्नात डिजेवर नृत्य केल्याच्या रागातून पत्नीची गळा चिरून हत्या केली व गावाच्या शिवारात झाडाला गळफास घेऊन पतीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा गावात घडली. दोघांच्या मृत्यूमुळे त्यांची तीन लेकरं पोरकी झाली आहेत. हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा नंबर 1 येथे चुलत भावाच्या लग्नाच्या निमित्ताने पायल विनोद राठोड (35), पती विनोद रंगराव राठोड (40, रा. धारजणी फुलवाडी तांडा, ता. भोकर) हे कुटुंब आपल्या तीन मुलाबाळांसह आले होते. 10 मे रोजी लग्नात पत्नीने डीजेवर नृत्य केल्याचा विनोद राठोड याला राग आला होता. यावरून दोघांमध्ये वाद देखील झाला. लग्नानंतर पायल राठोड या बोरगडी तांडा येथेच माहेर असलेल्या त्यांच्या माहेरी पती व मुलांना घेऊन गेल्या होत्या. पत्नीने लग्नात नृत्य केल्याच्या रागातून मंगळवारी (12 मे) पहाटे 3 वाजेच्या सुमारास विनोदने चाकूने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. त्यानंतर गावाच्या शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीची हत्या झाल्याचे सकाळी 10 वाजता घरच्यांच्या लक्षात आले. तसेच विनोदने आत्महत्या केल्याचे सकाळी 10 वाजता ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. दोघांच्या मृत्यूमुळे एक लहान मुलगा, दोन मुली अशी तीन लेकरं पोरकी झाली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी वैजंने, पोलिस निरीक्षक अमोल भगत आदींनी भेट दिली. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *