Headlines

लातूरच्या संस्थाचालकाची ‘स्वीटफूल’लिहीत डाेक्यात गाेळी घालून आत्महत्या:बंगल्यात एकटेच राहायचे, सुसाइड नोटमधील शब्दामुळे गूढ वाढले



डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक संजीव सोनवणे (६५) यांनी शहरातील पद्मानगर येथील घरात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. घटनास्थळी त्यांच्या परवानाधारक शस्त्रासह इंग्रजीतील सुसाइड नोट सापडली. त्यातील ‘स्वीट

.

सोनवणे हे बंगल्यात एकटेच राहत होते. त्यांची पत्नी, मुले व जावई अमेरिकेत आहेत. सोमवारी रात्री जेवण देऊन चालकाने बाहेरून गेटला कुलूप लावले होते. मंगळवारी सकाळी बहीण मंजू घरी आली असता दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये ते रक्ताच्या थारोळ्यात आढळले.संबंधित. पान २

१. एकटेपणातून टोकाचे पाऊल? कुटुंबीय अमेरिकेत असल्याने ते एकटेच होते. मानसिक ताण आणि एकटेपणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता आहे.

२. आजारपणाला कंटाळून? त्यांना काही व्याधींचा सामना करावा लागत होता. आजारपणाला कंटाळून त्यांनी जीवन संपवल्याचाही एक अंदाज आहे.

३. ‘स्वीट फूल’चे गूढ सुसाइड नोटमधील ‘स्वीट फूल’ (गोडपणे मूर्ख बनवणे) असा उल्लेखाची उकल झाल्यास आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल.

हस्ताक्षराची पडताळणी करणार

नातेवाइकांनी सुसाइड नोटमधील हस्ताक्षर‎सोनवणे यांचेच असल्याचे सांगितले‎आहे. तरीही पोलिसांनी त्यावर अंतिम‎शिक्कामोर्तब केलेले नाही. हस्ताक्षराची ‎खात्री करण्यासाठी हस्ताक्षर नमुन्यांच्या‎आधारे पडताळणी केली जात आहे.‎

मूळचे औसा तालुक्यातील मोगरगा येथील रहिवासी‎असलेले संजीव सोनवणे यांचे वडील डॉ. चंद्रभानू‎सोनवणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎विद्यापीठातील हिंदी विभागप्रमुख होते. त्यांच्या‎नावानेच त्यांनी लातूर शहरात कनिष्ठ महाविद्यालय‎स्थापन करण्यात आले होते. त्यांनी धाराशिव‎तालुक्यातील उक्कडगाव येथे मोठे महाविद्यालय‎स्थापन केले. पुणे आणि मुंबई येथेही त्यांच्या‎शैक्षणिक संस्था आहेत.‎

दोन दिवसांनंतर अंत्यसंस्कार‎

सोनवणे यांना एक मुलगी आणि एक‎मुलगा आहे. पत्नी, जावई सध्या‎अमेरिकेत आहेत. भाऊ मुंबईत तर ३‎बहिणी पुण्यात आहेत. कुटुंबीय‎पोहोचण्यासाठी २ दिवस लागतील.‎त्यामुळे अंत्यविधी १७ सप्टेंबरला होईल.

टुंबाला जबाबदार धरू नये‎

माझ्या कुटुंबातील कुणालाही यासाठी‎जबाबदार धरू नये तसेच त्यांना त्रास‎देऊ नये,’ अशा आशयाचा मजकूर‎नोटमध्ये असल्याचे पोलिसांनी‎सांगितले.नोटमध्ये नमूद असलेले ‘स्वीट‎फुल’ हे शब्द महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे.‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *