Headlines

वसमतमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई:दोन ठिकाणी हळद प्रक्रिया उद्योगाची तपासणी; 1 कोटीचा मुद्देमाल जप्त




वसमतमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दोन दिवसांत दोन ठिकाणी हळद प्रक्रिया उद्योगावर छापे टाकले आहेत. या ठिकाणी अस्वच्छता व अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत निकषाचे पालन केले जात नसल्याचे आढळून आल्याने दोन्ही ठिकाणचे परवाने शुक्रवारी ता. २३ निलंबीत करण्यात आले आहेत. तर दोन्ही कारवाईमध्ये १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्हयात अन्न व औषध प्रशासनाकडून मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. किराणा दुकान, हॉटेल्स यांची तपासणी केली जात असून त्या ठिकाणी असलेल्या खाद्य पदार्थाच्या साठ्याची तपासणी केली जात आहे. या शिवाय अस्वच्छता आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. दरम्यान, सध्या सण, उत्सवाचे दिवस असून या कालावधीत मसाले पदार्थाचा वापर जास्त होतो. त्यामुळे मसाले पदार्थांची तपासणी करून आवश्‍यकता वाटल्यास संबंधित अस्थापनेवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश अन्न व आैषध प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्हयात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सह आयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थापनांची तपासणी मोहिम युध्दपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान, वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे वसमत ॲग्रो या हळद तयार करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त पवन खताळ, अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे यांच्या पथकाने छापा टाकून तपासणी केली. या तपासणीमध्ये त्या ठिकाणी अस्वच्छता आढळून आली. त्यामुळे त्या ठिकाणचे हळदीचे नमुने तपासणीसाठी घेऊन ४० लाख रुपयांची हळद जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी ता. २३ वसमत येथील गणराज इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये तपासणी करण्यात आली. या ठिकाणीही अस्वच्छता व अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत निकषाचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. त्यावरून या ठिकाणीही ६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणचे अन्न व औषध प्रशासनाचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वसमत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *