Headlines

वसमतमध्ये बँक अधिकाऱ्याला शिवीगाळ:पैशांच्या तुटवड्यावरून कॅनरा बँकेत राडा, दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल




हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांमधून रकमांचा ठणठणाट असून ग्राहक अन अधिकाऱ्यांमधून पैशासाठी वादावादीला तोंड फुटले आहे. आरबीआय कडूनच रकमांचा कमी पुरवठा झाल्यामुळे नाणे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मात्र चांगलाच फटका सहन करावा लागते. वसमत येथे अधिकारी व ग्राहकांच्या वादातून दोघांवर गुरुवारी ता. 16 वसमत शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या सुमारे 60 पेक्षा अधिक शाखा आहेत. या शाखांना भारतीय स्टेट बँकेकडून रकमांचा पुरवठा केला जातो. तर भारतीय स्टेट बँकेला आरबीआय कडून रक्कम पुरविली जाते. मागील काही दिवसांत आरबीआयकडून कमी प्रमाणात रक्कमेचा पुरवठा झाल्यामुळे जिल्ह्यातील बँकांना रक्कम पुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्याचा बँकेच्या व्यवहारावर परिमाण झाला असून बँकेतून पैसे मिळत नसल्याने ग्राहकांच्या एटीएमवर रांगा लागत आहे. तर दुसरीकडे एटीएम मधे देखील ठणठणाट निर्माण झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या हळदीची खरेदी विक्री जोरात सुरु आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांकडे खरेदी केलेल्या हळदीचे पैसे देण्यासाठी रकमा नाहीत. त्यामुळे व्यापारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल नेनवाणी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे निवेदन सादर करून बँकांना आवश्‍यक सूचना देण्याची मागणी केली आहे. सध्या तरी बँकेतून पैसे मिळत नसल्याने बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहेत. सध्या लग्नसराई असल्यामुळे या कार्यक्रमांसाठी बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र पैसे मिळत नसल्याने या ग्राहकांचीही मोठी अडचण झाली आहे. त्यातून बँकेमध्ये अधिकारी व ग्राहक यांच्यात वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान , वसमत येथील कॅनरा बँकेच्या शाखेत 3.29 लाख रुपये रोख स्वरुपात का देत नाही या कारणावरून बँकेचे अधिकारी श्रध्दा चव्हाण यांना दोघांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी ता. 16 घडला आहे. या प्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे, जमादार गजानन भोपे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, बँकेत होणाऱ्या वादाच्या घटनांना अधिकारी देखील कंटाळले असून प्रत्येक ग्राहकांना समजावून सांगतांना अधिकाऱ्यांच्या तोंडाला फेस येऊ लागला आहे. त्यामुळे आता वरिष्ठस्तरावरून रक्कमांचा पुरवठा कधी होणार याकडे बँकेसह शेतकरी व बँक खातेदारांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *