Headlines

वाघूर नदीवर ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प:3 किमी रांगा, मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आले यश




अजिंठ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघूर नदीवरील पुलावर बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक ट्रक नादुरुस्त झाला. यामुळे दोन्ही बाजूंना तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास सोनवणे, दिलीप तडवी आणि संजय कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास वाहतूक पूर्ववत केली. निजामकालीन पुलाचे १९७२ मध्ये बांधकाम हा पूल १९७२ चा निजामकालीन असून जीर्ण झाला आहे. त्यामुळे या नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले असले तरी गेल्या पाच वर्षांपासून हे काम अपूर्णच आहे. या पुलावरून रोज हजारो वाहने धावतात. एका बाजूचे काम सुरू असूनही येथे सुरक्षा बोर्ड किंवा संरक्षण कठडे लावले नाहीत. चालकांना पुलाचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *