Headlines

विकासकामे करताना स्थानिकांना विश्वासात घेणे आवश्यक:केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचा विश्वास; प्रकल्पबाधितांना योग्य नुकसानभरपाई व पर्यायी घरे द्या



विकासकामांसाठी कॉरिडॉर उभारताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. संबंधित नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या सहमतीनेच विकासकामे झाली पाहिजेत. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना योग्य नुकसानभरपाई आणि पर्यायी घरे उपलब्ध करून दिली पाहिजेत.

.

पंढरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार समाधान अवताडे, राजाभाऊ सरवदे, सुनील सार्वगोड, संतोष पवार, बाळासाहेब कसबे, दीपक चंदनशिवे, ॲड. कीर्तीपाल सर्वगोड आदी उपस्थित होते. राज्यात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची कारणे शोधण्याची गरज असून, दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरून समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवून ते दुष्काळी पठारी भागाकडे वळविण्याची गरज आहे. तसेच धरणांची क्षमता वाढवून पाणीसाठ्यात वाढ केली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

विरोधक सध्या अधिक आक्रमक झाले असून, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. २०२४ च्या निवडणुकीत विरोधकांना अधिक जागा मिळाल्या, तरी आम्ही मतदानचोरीचा आरोप केला नाही. मात्र, विरोधकांकडून सातत्याने असे आरोप केले जात आहेत, असेही ते म्हणाले.

मतदार यादीतील बदलांबाबत बोलताना ते म्हणाले की, काही मतदार स्थलांतरित झाले आहेत, काहींची नावे दुबार आहेत, तर काही मतदारांचा शोध लागत नाही. आधार कार्डच्या आधारे मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देता येईल का, याचाही विचार सुरू आहे. राज्यातील सरकार चांगले काम करीत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची साथ मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही आठवले यांनी केले. पवार यांनी सोबत आल्यास त्यांच्या पक्षालाही सत्तेत स्थान मिळू शकते, असे ते म्हणाले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष संतोष पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येईल राहुल गांधी हे परदेशात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात. त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र, आमचे लक्ष टीकेपेक्षा विकासावर आहे. २०४७ पर्यंत भारत देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल आणि देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *