![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात येत्या १० ऑगस्टपासून दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट वापरणे पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे. आता केवळ दुचाकीचालकालाच नव्हे, तर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे बंधनकारक असेल. हेल्मेट नसल्यास विद्यापीठ परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘टारगेट झीरो फॅटलिटी डिस्ट्रिक्ट्स महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत रस्ते अपघातातील प्राणघातक घटनांमध्ये किमान १० टक्के घट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील सर्वाधिक अपघातग्रस्त ११ जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश असल्याने या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्वांसाठी नियम अनिवार्य विद्यापीठ परिसरात हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व अभ्यागतांना हा नियम लागू राहील. यासंदर्भात कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
Source link
विद्यापीठात 10 ऑगस्टपासून हेल्मेट नसेल तर नसणार एन्ट्री:दुचाकीचालकांसह मागे बसणाऱ्यालाही सक्ती; प्रशासनाचा इशारा