Headlines

विद्यार्थ्यांचा दिवाळी मेळावा गाजला; 30 हजार रुपयांची विक्रमी उलाढाल:माणिकराव पालोदकर इंग्लिश स्कूलमध्ये ‘दिवाळी मेळावा’ उत्साहात




माणिकराव पालोदकर इंग्लिश स्कूलचा ‘दिवाळी मेळावा २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. रूपाली पालोदकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गंगाधर मोरे, मुख्याध्यापिका मनीषा फुके, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा. कल्पकता, आत्मविश्वास, उद्योजकतेची भावना वाढावी. प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने मेळावा घेण्यात आला. डॉ. रूपाली पालोदकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी ‘हस्तकला कलाकौशल्य’ कार्यशाळा झाली. यात आकाशकंदील बनवणे, पणत्या रंगवून सजवणे, सजावटीच्या वस्तू तयार करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी दिवाळीचे साहित्य स्वतः तयार केले. या कलाकृतींना बाजारपेठ मिळावी म्हणून शाळेच्या प्रांगणात मेळावा भरवण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वस्तूंचे स्टॉल उभारले. आकर्षक दिवे, रंगीबेरंगी पणत्या, सजविलेले बोळके, आकाशकंदील, लक्ष्मीमूर्ती, तोरणे, चूल, जाते अशा पारंपरिक व सजावटीच्या वस्तू विक्रीस ठेवल्या. विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधला. वस्तूंची विक्री केली. विक्री कौशल्य, आर्थिक व्यवहार, नियोजन, ग्राहकांशी बोलण्याचा अनुभव मिळाला. विद्यार्थी, पालकांनी घेतला आस्वाद मेळाव्यात मिठाई, फराळाचे स्टॉल होते. समोसा, कचोरी, ढोकळा असे पदार्थही उपलब्ध होते. विद्यार्थी, पालकांनी आस्वाद घेतला. लहान मुलांसाठी ‘जम्पिंग जपान’सारखे मनोरंजनात्मक खेळ ठेवण्यात आले. शाळेचा परिसर खरेदी, आनंद, उत्साहाने गजबजला. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी ३० हजार रुपयांची विक्रमी उलाढाल केली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, कल्पकतेला मिळालेली ही पावती ठरली. उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *