![]()
नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा अकोट शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर बलप्रयोग करण्यात आल्याचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव ॲड. महेश गणगणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत पाचडे, अकोट शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सारंग मालाणी, अकोट तालुका अध्यक्ष अनोख राहणे, महासचिव मुकुंद पांडे, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद चोरे, माजी नगरसेवक सतीश हाडोळे, सरचिटणीस संजय आठवले, गजानन डाफे यांच्यासह अकोट नगरपरिषदेचे नगरसेवक अजहर भाई, परवेज भाई, खाजा भाई, अचल बेलसरे, बादल अहीर, माजी नगरसेवक अफजल भाई ,अब्दुल मुबारक, वैभव पाचडे, मिलिंद नितोने, रोशन चिंचोलकर, निखिल झाडे, सागर तेलगोटे, नितीन तेलगोटे, विशाल राठोड, विठ्ठल नहाटे, नागोराव केदार, बाळूभाऊ भास्कर, पप्पू ठेकेदार व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शवत, लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
Source link
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा अकोटमध्ये काँग्रेसकडून निषेध:राजीनाम्याची मागणी