Headlines

विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत खलबतं:बड्या नेत्यांची लॉबिंग; विक्रम काकडेंच्या नावाला विरोध, 'झिशान-राजेंद्र जैन' शर्यतीत




विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी इच्छुकांची गर्दी वाढली असून, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ‘देवगिरी’ निवासस्थानी नेत्यांची खलबतं पार पडली. आज, बुधवारी पुन्हा एकदा कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री ११ ते २ या वेळेत देवगिरी निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. या बैठकीत विविध नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विक्रम काकडे यांच्या नावाला अंतर्गत विरोध? विशेष म्हणजे कालच्या बैठकीत माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांची उपस्थिती. विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मित्र मानले जातात. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षातील इतर नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून मोठा विरोध होत असल्याची माहिती समोर येत आहे. या विरोधामुळे पक्ष कोण्या एका नावावर ठाम राहण्याऐवजी इतर पर्यायांचाही गांभीर्याने विचार करत आहे. उमेदवारीसाठी ‘हे’ नेते शर्यतीत एका जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये चुरस वाढली असून खालील नावांची प्रामुख्याने चर्चा सुरू आहे: आज कोअर कमिटीचा फैसला आज बुधवारी सकाळी पुन्हा एकदा ‘देवगिरी’वर नेत्यांची ये-जा सुरू झाली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीसाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे पोहोचले आहेत. या बैठकीत सर्व नेत्यांची मते जाणून घेऊन दुपारी ३ वाजेपर्यंत अधिकृत उमेदवाराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. जागांचे गणित आणि चुरस विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला ६, शिवसेनेला २ आणि राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ एकच जागा आल्यामुळे या जागेसाठी पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पक्ष कोणाला संधी देतो आणि नाराज नेत्यांची समजूत कशी काढतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *