Headlines

विधान परिषदेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ:17 पैकी 16 जागांवर महायुतीचा गुलाल, एका जागी अपक्ष; वाचा निकाल




महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने विरोधी पक्ष महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. राज्यातील एकूण १७ जागांपैकी तब्बल १६ जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे, तर नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत आपले खातेही उघडता आलेले नाही. अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अवस्था इतकी बिकट झाली की, कुणाला ५ तर देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला चक्क ‘शून्य’ मते मिळाली आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांचा निकाल सहा उमेदवार बिनविरोध विधान परिषद निवडणूक निकाल: महायुतीचा 16 जागांवर विजय, नाशिकमध्ये गोकुळ गितेंचा शिवसेनेला धक्का; महाविकास आघाडीचा सुपडा साफ महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल अखेर जाहीर झाला आहे. १८ जून रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत महायुतीने आपला वरचष्मा कायम राखत १७ पैकी तब्बल १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, नाशिकच्या जागेवर महायुतीला मोठा धक्का बसला असून, तिथे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुती आणि शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केलाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. सविस्तर वाचा गोकुळ गीतेंना आम्हीच मदत केली: नाशिक निकालानंतर राऊतांचा दावा, म्हणाले- भाजपच्याच लोकांनी शिंदेंचा उमेदवार पाडला नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ गीते यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याचा खुलासा करताना, “गोकुळ गीते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितले होते. आम्ही त्यांना मदत केली आणि आमचे मतदान त्यांच्या बाजूने वळवले. त्याचा त्यांना फायदा झाला,” असे राऊत यांनी सांगितले. सविस्तर वाचा नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *