![]()
येथील भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त साखरखेर्डा येथे विविध कार्यक्रमाने जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सकाळी ९ वाजता गावात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर १० वाजता भीमनगर येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार गजानन करेवाड होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्रीराम गवई यांच्या हस्ते बुद्धपूजा, त्रिशरण पंचशील व महामानवांना अभिवादन करून करण्यात आली. यावेळी उत्सव समितीच्या वतीने ठाणेदार करेवाड व इतर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थिनी कृतिका अनिल मोरे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रभावी विचार मांडले. तसेच शिक्षक अशोक गवई यांनी बाबासाहेबांवरील गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या कार्यक्रमास सर्वधर्मीय नेतेमंडळी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू ठोके यांनी केले, तर संचालन सुभाष गवई व दर्शनकुमार गवई यांनी केले. दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या रथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिकात्मक दर्शन घडवण्यात आले. लहान मुलांचे लेझीम पथक व महिला मंडळाच्या टिपरी पथकाने मिरवणुकीत रंगत आणली. गुजरी चौकात विविध धर्मीय युवकांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या वेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Source link
विविध उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी