Headlines

वीरगावच्या गुणवंत लेकींच्या गुणवत्तेला रोख बक्षिसांची दाद




ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि कर्तृत्वाची कमतरता नाही. योग्य संधी, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात. गुणवंतांचा गौरव म्हणजे त्यांच्या पुढील वाटचालीला बळ देण्यासोबतच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा निर्माण करणे होय, असे प्रतिपादन विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी केले. वीरगाव येथील विश्व हायटेक नर्सरीचे संस्थापक भूमिपुत्र स्व. नानासाहेब गोविंदराव थोरात यांच्या स्मरणार्थ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. अगस्ति शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली खुशी विकास दौंड, द्वितीय आलेली शर्वरी रोहिदास सहाणे आणि तृतीय आलेली प्रगती सुधाकर पानसरे यांना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन पालकांसह गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापकपदी नियुक्त झालेले वीरगावचे सुपुत्र शंतनू ज्ञानेश्वर खुळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातून उच्च पदापर्यंत पोहोचलेल्या शंतनू यांच्या यशामुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व्यासपीठ देणारा हा उपक्रम केवळ पारितोषिक वितरणापुरता मर्यादित नसून शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणारा आहे. व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपत गुणवंतांना प्रोत्साहन देण्याची विश्व हायटेक नर्सरीची परंपरा कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी वीरगाव विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुनील वाकचौरे, अनिल डोळस, लहुजी दातखिळे, अविनाश भागवत, सुमित मेंगाळ, संतोष अस्वले आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *