Headlines

वृक्षतोड रोखा अन्यथा जनआंदोलन; राष्ट्रवादीसह पर्यावरणप्रेमींचा एल्गार:बागलाण तहसील कार्यालयात अर्धा तास ठिय्या, तहसीलदारांना निवेदन



विकासाच्या नावाखाली बागलाणसह भीमाशंकर, कर्जत आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वृक्षतोड तातडीने थांबवून संबंधित परवानग्यांची चौकशी करावी, अन्यथा

.

एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असताना विविध विकासप्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असून देशातील ४४ प्रकल्पांपैकी २८ प्रकल्प महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आला या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीमुळे जंगलक्षेत्रावर परिणाम होण्याची भीती असून, सह्याद्रीतील जंगलतोडीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात जंगलतोडीमुळे पाणीटंचाईचे संकट वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी प्रा. शांताराम गुंजाळ, ॲड. सरोज चंद्रात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष भारत काटके, मनोज सोनवणे, दादा खरे आदींसह पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देताना माजी आमदार संजय चव्हाण, प्रा. शांताराम गुंजाळ, ॲड. सरोज चंद्रात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष भारत काटके आदी. पुनर्लागवडीचा तपशील श्वेतपत्रिकेद्वारे जाहीर करावा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात बागलाणसह सह्याद्रीच्या विविध भागांतील वृक्षतोडीला स्थगिती देऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. विकासप्रकल्पांना दिलेल्या वृक्षतोड परवानग्यांची उच्चस्तरीय समितीमार्फत तपासणी करावी, आतापर्यंत झालेल्या वृक्षतोडीचा आणि त्याबदल्यात करण्यात आलेल्या पुनर्लागवडीचा तपशील श्वेतपत्रिकेद्वारे जाहीर करावा, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागांतील प्रकल्पांच्या पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष सार्वजनिक करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *