![]()
यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा बिकट परिस्थितीतही खासगी बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची कर्जवसुली सुरू
.
हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तरीही फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी महिला बचत गटांच्या सदस्यांवर व नागरिकांवर कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दबाव आणून दमदाटी करत आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वित्तीय संस्थांच्या वसुली प्रक्रियेवर लक्ष ठेवावे आणि कर्जदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी आवाळे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाध्यक्ष भागवत वंगे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रतीक पारशेट्टे, सिद्धेश्वर चाकुरे, गणपती चाकुरे, सरपंच इंद्रजित माने, संतोष देशमुख, परमेश्वर कामगुठा आदींनी केली आहे.
तहसीलदारांनी बैठक घेण्याची मागणी वित्तीय संस्थांकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीला आळा घालण्यासाठी शिरूर अनंतपाळ येथील तहसीलदारांनी सर्व खासगी फायनान्स कंपन्या आणि बँकांच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कर्जदारांना सवलत व हप्त्यांची पुनर्रचना करून द्यावी.