Headlines

वृक्षारोपण अभियानामधून‎राहात्याचा होणार कायापालट‎:"साईयोग''च्या पुढाकारातून खटकळी येथे वृक्षारोपण‎




प्रतिनिधी | राहाता येथील डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे साईयोग फाउंडेशनद्वारे राहाता व परिसरात गेल्या १७ वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणार्थ गेल्या ९ वर्षांपासून वृक्षारोपण अभियान अंतर्गत हजारो वृक्षांची लागवड करून संवर्धनही केले आहे. नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते खटकळी परिसर येथे १२ फुटी वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार हेमंत पाटील, नगरसेवक पप्पू शेळके व साईयोग फाउंडेशनचे व्यंकटेश अहिरे, माजी नगराध्यक्ष डॉ के. वाय. गाडेकर, माजी नगरसेविका डॉ. मंगला गाडेकर, डॉ. निर्मला गाडेकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. वृक्षसंवर्धनाच्या विशेष कार्याबद्दल प्रभाकर नावकर यांचा नगराध्यक्ष डॉ. गाडेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राहाता शहराची हरित क्रांतीकडे वाटचाल सुरू आहे. जेव्हा मी राहाता शहरात कार्यरत झालो तेव्हापासून या फाउंडेशनचे नाव ऐकून होतो. या फाउंडेशनच्या माध्यमातून राहाता शहराचा कायापालट करून हजारो वृक्षाची लागवड या ठिकाणी केली आहे. तसेच वर्षभर नवनवीन उपक्रम सुरू असल्याने या सदस्यांना एक प्रकारचे ऊर्जा मिळत आहे, असे नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी सांगितले. बाळासाहेब गाडेकर यांनी फाउंडेशनच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जेष्ठ सदस्य रविंद्र धस यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *