Headlines

वेद-कुराणात प्रेम, मानवता आणि नैतिकतेची शिकवण: मौलाना वहीदुल्लाह अन्सारी चतुर्वेदी यांचे एमआयटी डब्ल्यूपीयूच्या व्याख्यानमालेत विचार – Maulana Wahidullah Ansari Chaturvedi Lecture at MIT-WPU Pune



वेद आणि कुराण या दोन्ही धर्मग्रंथांत प्रेम, मानवता, सत्य आणि ईश्वरभक्तीची शिकवण आहे, असे लखनौचे मौलाना वहीदुल्लाह अन्सारी चतुर्वेदी यांनी सांगितले. पुण्यात एमआयटी डब्ल्यूपीयूच्या ३१व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या चौ

.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. ‘वेद आणि कुराण’ हा त्यांच्या भाषणाचा विषय होता.

चतुर्वेदी म्हणाले, “या दोन्ही धर्मग्रंथांचा मुख्य गाभा वैश्विक मानवी मूल्ये आणि नैतिकता आहे. प्रेम, मानवता आणि ईश्वराची उपासना हे त्यांचे मूळ आहे. परस्पर प्रेम, सामाजिक सुधारणा आणि सलोखा हेच वेद आणि कुराणातील खरे ज्ञान आहे.”

“मानवतेसाठी चांगले काम करा, वादविवाद टाळा. धार्मिक सलोखा ही आपल्या समाजाची ओळख आहे. सर्वधर्मसमभाव आणि ऐक्य विश्वशांतीसाठी पूरक आहे. आपले जीवन दुसऱ्यांच्या कल्याणासाठी अर्पण करा,” असेही त्यांनी सांगितले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष आणि युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड ऑनलाइन उपस्थित होते. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, प्रो. मंजूषा आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रेही उपस्थित होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे.

सकाळच्या सत्रात विनोद भिडे यांनी वैयक्तिक आणि संस्थात्मक निवडींचे मूल्यमापन तसेच जीवनातील विकासाच्या तत्त्वज्ञानावर भाष्य केले. ध्येयामागील प्रेरणा तपासण्यासाठी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

ही प्रेरणा सहजप्रवृत्ती, असुरक्षिततेची भावना, सकारात्मक विचारसरणी किंवा विधायक दृष्टिकोनातून आली आहे का, याचा विचार करावा, असे भिडे यांनी सांगितले. आयुष्यातील निर्णयांचा उद्देश प्रगती साधणे असतो. व्यक्तीचा विकास केवळ भौतिक पातळीवर मर्यादित नसून तो बौद्धिक, वैचारिक आणि आध्यात्मिक उंचीपर्यंत जातो, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *