![]()
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा जवळपास निश्चित मानला जात आहे. या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमो
.
अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधतांना म्हटले की, शरद पवार हे नेहमी काळाची गरज ओळखून बदल करत असतात. तसेच शरद पवार यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या संदर्भात स्टेटमेंट केले नाही. सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते की आम्ही अनुकूल आहोत. जितेंद्र आव्हाड सांगत आहेत की पाठिंबा आहे. रोहित पवार यांची मात्र वेगळीच भूमिका आहे, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.
दादांना वेळोवेळी तोंडावर पाडले
पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, अजितदादा पवार यांनी भूमिका घेतली होती, तेव्हा प्रसंग पाहून भूमिकाघेतली होती. सत्तेमध्ये सर्वच जण जाऊ म्हणाले तेव्हा दादांना वेळोवेळी तोंडावर पाडले. यांच्या राजकारणामुळे सोन्यासारखा माणूस गमावला, अशी खंत मिकरी यांनी बोलून दाखवली.
रोहित पवार पक्षात एकटे पडले आहेत
तसेच जनतेचा घोळ झालेला आहे. डिलिमिटेशनसाठी पवारांचा पाठिंबा अद्यापही गुलदस्त्यात आहे. तो व्हिप जारी केलेला आहे. शरद पवार यांचा पक्ष एनडीए सोबत आहे हे आता दिसत आहे, असे मिटकरी यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, भविष्यामध्ये विजय वड्डेटीवार भाजपवाशी होऊ शकतात. रोहित पवारांविषयी बोलताना मिटकरी म्हणाले की, रोहित पवार एनडीएत जाणार नाहीत. त्यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलेले आहे. तरुणांमध्ये चुकीचा मेसेज जाईल. प्रतिमा मलीन होऊ शकते, म्हणूनच त्यांनी ट्विट केलेले आहे. पक्षात रोहित पवार हे एकटे पडले आहेत, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.