Headlines

वैजापूर तालुक्यामध्ये 21 गावांना 27 टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा:आणखी 25 गावांचे टँकरसाठी प्रस्ताव




कुठे विहिरी आटल्या, कुठे पिके करपली, तर कुठे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला. दुष्काळाच्या विळख्यात सापडलेल्या तालुक्यातील १६४ गावांच्या समस्यांचे केंद्र आता तहसील कार्यालय ठरत आहे. सकाळपासून पाणीटंचाईचे प्रस्ताव, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारी, पंचनाम्यांचा आढावा, महसूल प्रकरणांच्या सुनावण्या आणि निवडणुकीच्या जबाबदाऱ्या अशा परिस्थितीत मर्यादित मनुष्यबळावर महसूल यंत्रणेचा गाडा हाकताना तहसीलदार सुनील सावंत यांची कसरत सुरू आहे. एका गावाचा प्रश्न मार्गी लावताच दुसऱ्या गावातून मदतीची मागणी येत असल्याने संपूर्ण महसूल यंत्रणेची कसोटी लागत आहे. तालुक्यात २१ गावांना २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची नोंद असून, २५ गावांतून मागणी आहे. नऊ जलप्रकल्पांचा उपयुक्त साठा १ ऑक्टोबरला ९.२२ टक्के होता. पाच प्रकल्पांचा उपयुक्त साठा शून्यावर आल्याने उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन आतापासून करावे लागणार आहे. दुसरीकडे पिकांचे ८६ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची नोंद आहे. उर्वरित कामे, मदतीचे प्रस्ताव आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी कर्मचाऱ्यांचा समन्वय महत्त्वाचा ठरत आहे. दुष्काळी कामांबरोबरच सातबारा, फेरफार, जमीनविषयक वाद आणि नियमित महसूल प्रकरणे थांबवून चालणार नाहीत. निवडणुकीच्या कामांची भर पडल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. महसूल, पंचायत समिती, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा विभागांना एकत्र घेऊन उपाययोजना राबविण्याची जबाबदारी आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर कामांचा वाढता डोंगर तालुक्यातील १६४ गावांचा महसूल कारभार सांभाळतानाच दुष्काळी पंचनामे, टँकर प्रस्ताव, तक्रारी आणि निवडणुकीची कामे करावी लागत आहेत. काही महसूल कर्मचाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असल्याने प्रत्यक्ष पाहणीस वेळ काढणे आव्हानात्मक ठरते. अशा परिस्थितीत तलाठी, मंडळ अधिकारी आणि इतर विभागांतील कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन, प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा आणि समस्यांना प्राधान्य देणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे. गावांच्या समस्यांवर प्रशासनाचे लक्ष Ãदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व गावांच्या समस्यांवर प्रशासनाचे लक्ष आहे. पाणीटंचाई, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे, चारा आणि रोजगाराच्या प्रश्नांवर संबंधित विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना वेळेत दिलासा मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाहीला प्राधान्य देण्यात येईल. कर्मचाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत. – सुनील सावंत, तहसीलदार, वैजापूर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *