Headlines

शंभुशौर्य मर्दानी आखाडातर्फे प्रशिक्षण शिबिर‎:कंवरनगर स्थित मनपा शाळा क्रमांक 16 च्या प्रांगणात 30 मेपर्यंत चालणार प्रशिक्षण




आजच्या बालसुलभ मनावर सुसंस्कार करुन त्यांना शारीरिक व मानसिकरित्या सक्षम बनवण्यासाठी आज, गुरुवार, १५ मे पासून येथे खेळ, स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिर सुरू झाले. शिवकालीन महाराष्ट्राला अभिप्रेत असलेले हे शिबिर येथील शंभुशौर्य मर्दानी आखाडातर्फे सुरू करण्यात आहे. ते आगामी ३० मे पर्यंत चालणार आहे. कंवरनगर स्थित मनपा शाळा क्रमांक १६ च्या प्रांगणात सुरू असलेल्या या शिबिरात पारंपरिक शस्त्रे लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, स्व संरक्षण, भाला, विटा, पारंपरिक शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय शिवकालीन गुप्तहेरखात्यात वापरली जाणारी करपल्लवी भाषा अशा पारंपरिक मर्दानी अभ्यासाचा समावेशही या प्रशिक्षणात केला जाणार आहे. आजच्या आधुनिक जगात आपल्या पारंपरिक कलागुणांना जोपासून व्यक्तिमत्व विकास आणि स्वसंरक्षण करण्यासाठी उपरोक्त बाबी अतिशय महत्त्वाच्या आहे. आयुष्य शिस्तबद्ध आणि अधिक तेजस्वी करण्यासाठी त्या फायद्याच्या आहेत. हे शिबिर दररोज सकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत राहणार आहे. वयाची दहा वर्षे पूर्ण केलेल्या कुणालाही प्रवेश दिला जाणार आहे. शिबिराचे हे तिसरे वर्ष असून, या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *