![]()
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा जवळपास निश्चित मानला जात असून, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनीही याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत अस
.
चंद्रकांत खैरे म्हणाले, शरद पवार यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दिलेला पाठिंबा आम्हाला पटलेला नाही. त्यांच्या मागे महाविकास आघाडीमध्ये जाऊन आम्ही आमचा नुकसान करुन घेतले. ते भाजपकडे जातील, तुम्ही असेच राहणार असे अनेक नेते म्हणत होते. त्यांच्याबरोबर राहून काय फायदा झाला? सत्तेतही राहिलो नाही. त्यांनी आम्हाला धोका दिला आहे. आताची परिस्थिती अशी आहे की, त्यांनी आम्हाला धोका दिल्यासारखी आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचे तळ्यात-मळ्यात सुरू असल्याचेही खैरे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, वसंतदादांपासून आम्हाला शरद पवारांची हिस्ट्री माहिती आहे. ते बाळासाहेबांचे मित्र होते. त्यांनी आम्हाला आणले आणि स्वतःच निघून गेले. मी शरद पवारांना बाळासाहेबांरखा मानतो मात्र ते आज निघून गेले आम्हाल दुःख झाले. आता महाविकास आघाडीत राष्ट्रवादी राहण्याचा संबंध नाही. राष्ट्रवादीने उघड बंड केले आहे. आम्हाला महाविकास आघाडीमध्ये ढकलून हे स्वतः पळून गेले. आम्हाला एकत्र आणले अन तेच पळून गेले. आमचे काय राहीले, आमचे एवढे आयुष्य गेले, यांच्या मागे आम्ही भरकटून गेलो. शिंदेंचे लोक पहा, असे खैरे म्हणाले.
सोमवारपासून लोकसभेचे अधिवेशन
दरम्यान, सोमवारपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनात केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण ही दोन महत्त्वाची विधेयके पटलावर मांडण्यात येणार आहेत. यापूर्वीही सरकारने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु विरोधकांच्या एकजुटीमुळे ते शक्य झाले नव्हते; त्यामुळे आता या आगामी अधिवेशनात सरकार पुन्हा एकदा ही विधेयके संसदेत सादर करणार आहे.