![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळासह कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शरद पवार यांना नेमका कोणता त्रास होत आहे, याबाबत विविध चर्चा सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. शरद पवार यांना उपचारासाठी नव्हे, तर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील रूबी रुग्णालयात झाले होते उपचार शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी कफाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर ते पुन्हा नियमित कामकाजाला सुरुवात करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आता त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अनेकांकडून विचारणा केली जात होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. शरद पवार यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना पुन्हा गंभीर त्रास सुरू झाला आहे का, अशा चर्चांना पूर्णविराम देताना सध्या उपलब्ध माहितीनुसार रुग्णालयात दाखल करण्यामागे तपासणी हे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांच्या तपासणीचे नेमके स्वरूप आणि पुढील वैद्यकीय प्रक्रियेबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. कार्यकर्त्यांकडून प्रकृती लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाला अनेक दशकांचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयीची कोणतीही बातमी समोर आल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते आणि समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जाते. काही दिवसांपूर्वी कफाच्या त्रासामुळे पुण्यात उपचार घ्यावे लागल्यानंतर आता पुन्हा मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, डॉक्टरांकडून करण्यात येणाऱ्या तपासणीनंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. हेही वाचा…. दिवाळीपूर्वी बळीराजाला दुहेरी दिलासा:दुष्काळी मदतीसह कर्जमाफीचे पैसे थेट खात्यात, CM देवेंद्र फडणवीसांची माहिती राज्य शासनातर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलेली 5 हजार रुपयांची अग्रिम मदत आतापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून, येत्या दोन दिवसांत 95 टक्के लाभार्थ्यांपर्यंत ती पोहोचेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासोबतच, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’अंतर्गत आज आणखी 4 लाख 86 हजार शेतकऱ्यांच्या (ज्यात सर्वाधिक 2.76 लाख शेतकरी मराठवाड्यातील आहेत) खात्यात 4,764 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 21 लाख शेतकऱ्यांना तब्बल 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा….
Source link
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल:मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती