![]()
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढली आहे. शहरातील नऊ वेगवेगळ्या एटीएम मशीनवर जिथून नोटा बाहेर येतात, तिथे चोरट्यांनी धातूच्या पट्ट्या चिपकवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. ३१) पहाटे उघडकीस आला. बँकेच्या पुणे येथील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाच्या सतर्कतेमुळे शहर पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका टळला आहे. शनिवारी सकाळी बँकेच्या पुणेस्थित नियंत्रण कक्षाकडून शहर पोलिसांना राजापेठ परिसरातील काही एटीएमशी छेडछाड झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मशीनमधून जिथून रोख रक्कम बाहेर येते, तिथे चोरट्यांनी बारीक धातूची पट्टी लावली होती. त्यावर पांढऱ्या रंगाचे कोटिंग केले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांनी तत्काळ शहरातील सर्व ठाणेदारांना आपापल्या हद्दीतील एटीएमची पाहणी करण्याचे निर्देश दिले. 1. कार्ड स्लॉट व कॅमेरा तपासणे कार्ड टाकण्याच्या जागेची तपासणी करावी. वरच्या बाजूला छुप्या स्वरूपाचा कॅमेरा लावला आहे का, हे पाहावे. 2. पिन गुप्त ठेवणे पासवर्ड किंवा पिन नंबर टाकताना दुसऱ्या हाताने कीपॅड झाकून घ्यावा. तो कोणालाही दिसणार नाही. तो कॅमेऱ्यातही दिसणार नाही. चोरटे एटीएममधील पैसे बाहेर पडणाऱ्या जागेवर (कॅश डिस्पेन्सर) धातूची पट्टी चिपकवून ठेवतात. ग्राहक कार्ड स्वॅप करतो. तो पिन टाकतो. तो पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करतो. मशीनमधून पैसे बाहेर येत आहेत, असे ग्राहकाला वाटते. मात्र या पट्टीमुळे नोटा अडकून पडतात. ग्राहकाला वाटते की काहीतरी तांत्रिक अडचण असावी. त्याला नेटचा प्रॉब्लेम वाटतो. तो निघून जातो. आसपास दबा धरून बसलेले चोरटे ग्राहक निघून जाताच तिथे येतात. ते पट्टी काढतात. अडकलेली रक्कम घेऊन पसार होतात. 3. कॅश स्लॉटची पाहणी पैसे बाहेर येण्याच्या जागेवर कोणतीही अतिरिक्त लोखंडी पट्टी, टेप किंवा बॉक्स चिपकवला आहे का, याची खात्री करूनच व्यवहार करावा.
Source link
शहरामधील 9 एटीएमवर ‘पट्टी' लावून रक्कम लुटण्याचा प्रयत्न:बँकेच्या सुरक्षा प्रणालीव्दारे गैरप्रकार आला उघडकीस