![]()
वसंतटेकडी येथील श्री. नाथ विद्या मंदिर, शनैश्वरनगर येथे दिव्य मराठीच्या आवाहनाला प्रतिसाद विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. शनिवारी सकाळी ११ वाजता आयोजित कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीचे महत्त्व, पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची गरज तसेच गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे संरक्षण कसे करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, निसर्गप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच नागरिकांनीही पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेस मार्गदर्शक बालाजी वल्लाळ यांचे मार्गदर्शन लाभले. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून पर्यावरणसंरक्षणाचे कार्य करणारे ऋषिकेश लांडगे व गौतम गराडे उपस्थित होते. यन्नम मॅडम यांनी वल्लाळ यांचा परिचय करून दिला. यावेळी कडनोर मॅडम यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापिका साईगीता सब्बन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. सूत्रसंचालन व्ही. बी. कबाडी यांनी केले. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक केले.
Source link
शाडू मातीच्या गणरायालाविद्यार्थ्यांच्या हातांनी आकार:श्री.नाथ विद्या मंदिरात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा