Headlines

शिर्डीत दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड:मुद्देमाल केला जप्त




शिर्डी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत रेल्वे ट्रॅकजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून तलवार, दोन चाकू, मिरचीपूड, कटावणी, नायलॉन दोरी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा सुमारे १७ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप मुटकुळे यांच्या नेतृत्वातील पथक शुक्रवारी शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी शिर्डी-रेल्वे स्थानक मार्गावरील रेल्वे ट्रॅकजवळ काही संशयित दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता रेल्वे पोलच्या आडोशाला काही जण बसलेले दिसले. पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी पाठलाग करून सात जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिद्धार्थ संजय जाधव (२६, शिरापूर, ता. शिरूर कासार), सुशील गोपीनाथ पवार (३३, नवघन राजुरी, जि. बीड), विजय बाळासाहेब गायकवाड (१९, लव्हळे एक नंबर, ता. माजलगाव), एकनाथ महादेव मासाळकर (४४, विजयनगर, ता. पाथर्डी), नितीन शिवाजी धोत्रे (३१, विजयनगर, ता. पाथर्डी), लखन अर्जुन मुरकुटे (२९, मुर्शदपूर, ता. आष्टी), सोमनाथ कैलास कुसळकर (२६, गणपती मंदिराजवळ, आष्टी) यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी राहुल कचरू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *