![]()
आधुनिकतेच्या युगातही अनेक शाळा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. परिणामी ग्रामीण विद्या र्थ्यांच्या शिक्षनाचा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शिवना केंद्रातील १९ पैकी ५ शाळा जीर्णावस्थेत तर ३ शाळांत वीज नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना
.
सिल्लोड तालुक्यातील शिवना केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था शिक्षणव्यवस्थेतील वास्तवता दर्शविणारी आहे. केंद्रात एकूण १९ शाळांचा समावेश असून, त्यापैकी वाघेरा, नाटवी, जळकी बाजार, खुपटा नवा आणि प्रशाला शिवना या शाळांची स्थिती गंभीर बनली आहे. अनेक इमारतींना तडे गेले असून, काही ठिकाणी टिनपत्रे गळतात. एकीकडे नवीन शैक्षणिक धोरणाच्या घोषणा होत असताना दुसरीकडे शाळांची बकाल अवस्था शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर सुरक्षा तपासणी अनिवार्य केली आहे. त्याअनुषंगे शुक्रवारी शिवना केंद्रातील शाळांची तपासणी पथकाने पूर्ण केली आहे. शिवना केंद्रात १९ शाळा असून, यामध्ये ७४ शिक्षक कार्यरत आहेत. तर २ हजार ६५० विद्यार्थ्यांची संख्या आहे. खुपटा नवा, जळकी बाजार, वाघेरा, नाटवी, प्रशाला शिवना येथील शाळेच्या जीर्ण व धोकादायक इमारती आहेत. तर शिक्षकांची ६ पदे रिक्त आहेत. वीज नसलेल्या शाळांमध्ये सतीआई, बिबाडवाडी, भोपळेवाडी या शाळांचा समावेश असून, वाघेरा जि.प. शाळेत वर्गखोल्यांचा अभाव आहे. Ãशाळेच्या दुरवस्थेबाबत काही प्रश्न असतील तर केंद्रप्रमुखांनी प्रस्ताव दाखल करावेत. शाळांच्या मान्सूनपूर्व तपासणीतही याची माहिती मिळणार आहे. तपासणीत धोकादायक संरचना आढळली असेल, तर ती पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. येईल. – राजेंद्र महाजन, गटशिक्षणाधिकारी, सिल्लोड वाघेरा येथे लोकसहभागातून शाळेसाठी जागा खरेदी करण्याची वेळ आली. या शाळांना भौतिक सुविधा देण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, ज्या शाळांची अवस्था खराब आहे, तसे पत्र शिक्षण विभागाला दिले असल्याचे केंद्रप्रमुख नारायण भोंबे यांनी सांगितले.
शिवना केंद्रातील १९ शाळेत ३६५० विद्यार्थी घेतात शिक्षण
केंद्रप्रमुखांनी प्रस्ताव दाखल करावेत, तपासणी करण्यात येईल