Headlines

शिवन्यात बुलढाण्याहून कारमध्ये येणारा 5लाखांचा गुटखा जप्त:गुन्हे शाखेची कारवाई, परराज्यातील कनेक्शनचा तपास पोलिसांकडून सुरू




गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी शिवना येथे कारवाई केली. या कारवाईत कार आणि प्रतिबंधित गुटखा असा १५ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सादिक कडू पठाण (३३, रा. तुर्काबाद खराडी, ता. गंगापूर) याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अजिंठा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना, बुलढाणा जिल्ह्यातून प्रतिबंधित गुटखा घेऊन एक कार शिवनामार्गे अजिंठा-सिल्लोडकडे येणार असल्याची माहिती मिळवली. पथकाने शिवना येथे सापळा रचला. सकाळी कार (एमएच २० जीव्ही ९४०८) कारची तपासणी केली. मध्यप्रदेशातील एकासोबत संगनमत करून वाहतूक वाहनातील गोण्यांमध्ये पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला. यात ५ लाख १९ हजार २०० रुपयांचा गुटखा आणि १० लाख रुपयांची कार जप्त केली. सादिक पठाण याने धीरज मालवाणी (रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) याच्यासोबत संगनमत करून ही वाहतूक केल्याचे समोर आले. अजिंठा पोलिस पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *