![]()
शहर व तालुक्यात शिवप्रेमी संघटना व संस्थांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.येथील शिवराज्य सेनेच्यावतीने शिवभक्तांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. शिवाजी कॉलेज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ मूर्तीजवळ हा सोहळा झाला. यावेळी शिवराज्य सेनेच्या वतीने शिवरायांच्या मूर्तीला पंचामृताने महाअभिषेक घालण्यात आला. विशेष म्हणजे, यावेळी उपस्थितांनी दिलेल्या “जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मागील १७ वर्षापासून शिवराज्य सेना शिवराज्याभिषेक दिन थाटामाटात साजरा करत आहे. यावेळी नगरसेवक आकाश राऊत, राहुल काळे, निखिल बारसकर, संदीप पाटील, सोमनाथ डमरे, यांच्यासह शिवराज्य सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुसंख्येने शिवभक्त उपस्थित होते. शेवटी सर्व शिवभक्तांनी एकत्रितपणे ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र घेतला. त्यानंतर उपस्थित नागरिकांना मिठाई वाटप करून उत्साहात या सोहळ्याची सांगता करण्यात आली. येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ व संचालक धिरज कुंकूलोळ, प्रमोद भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
शिवराज्य सेनेतर्फे शिवरायांच्या पुतळ्यास पंचामृताने महाअभिषेक:तालुक्यातील विविध सामाजिक संघटना अन् राजकीय पक्षाकडून अभिवादन