![]()
“राज्यातील गडकिल्ले व धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडोझर चालवून जिहादमुक्त केली. छत्रपती संभाजीनगर ही छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांची भूमी आहे. येथील औरंगजेबाच्या कबरीपासून ही भूमी मोकळा श्वास घेईल, अशी ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल,” असा आक्रमक इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला. देवा सेवा ट्रस्टतर्फे आयोजित “प्रौढ प्रताप पुरंदर’ नाटकाच्या प्रयोगावेळी ते बोलत होते. “शिवरायांना सेक्युलर ठरवू नका, ते हिंदू साम्राज्य संस्थापकच होते. सैन्यात मुस्लिम होते तर मग आज मुस्लिम मोहल्ल्यांत शिवजयंती का साजरी होत नाही? मशिदींवर रोषणाई का दिसत नाही?” असा घणाघात राणेंनी केला. या वेळी मंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड, महापौर समीर राजूरकर, ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र साबळे पाटील उपस्थित होते. धार्मिक ध्रुवीकरणाची खेळी बुलडोझर पॅटर्नचा थेट उल्लेख करत कबरीचा मुद्दा छेडणे ही हिंदुत्ववादी मतपेढी भक्कम करण्याचा आणि प्रशासकीय कारवाईसाठी थेट राजकीय दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
Source link
शिवरायांना ‘सेक्युलर’ म्हणणाऱ्यांना मंत्र्यांनी सुनावले:संभाजीनगर लवकरच औरंगजेबाच्या कबरीतून मोकळा श्वास घेईल- राणे