![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघ महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 चे अधिकृत उमेदवार दिलीप घुगे यांनी आज 5 ऑक्टोंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह दिलीप घुगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आपण ही निवडणूक लढवत आहोत. पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जात असून मराठवाड्यातील सुशिक्षित पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपली भूमिका राहणार आहे.पदवीधरांच्या शिक्षण, रोजगार आणि विविध प्रश्नांसाठी ठोसपणे आवाज उठविण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही घुगे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, आमदार राहुल पाटील, प्रवीण स्वामी तसेच शिवसेना उपनेते सुभाष पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सतीश चव्हाण पुन्हा एकदा रिंगणात:औरंगाबाद पदवीधरमधून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार; सुनील तटकरेंकडून उमेदवारीचे पत्र सुपूर्द औरंगाबाद पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सतीश भानुदासराव चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनी याअगोदर 2008, 2014, 2020, 2026 असे टर्म प्रतिनिधीत्व केलेले असल्याने पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केले आहे. वाचा सविस्तर
Source link
शिवसेना ठाकरे गटाकडून दिलीप घुगेंना उमेदवारी:छत्रपती शिवरायांना अभिवादन करत भरला अर्ज; तर राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण रिंगणात