![]()
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करत उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांना आपल्या गोटात खेचल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची दिल्लीतील ताकद कमालीची वाढली आहे. याच वाढलेल्या वजनामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी फेरविस्तारामध्ये शिंदे गटाला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच (1 जुलै) दिल्ली दौऱ्यावर जाण्याची दाट शक्यता असून, यामुळे दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात होणारे संभाव्य फेरबदल, नवीन चेहऱ्यांवरून विविध चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गटाला 3 मंत्रिपदे, श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट? लोकसभेतील वाढलेले संख्याबळ लक्षात घेता केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला आता एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री अशी एकूण तीन मंत्रिपदे मिळण्याची चर्चा आहे. खासदार श्रीकांत शिंदे: महायुतीचे समीकरण मजबूत करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव कॅबिनेट मंत्रीपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. २०२४ मध्ये त्यांनी हे पद नाकारले होते, मात्र आता पक्षातील नेत्यांच्या आग्रहास्तव ते हे पद स्वीकारण्याची दाट शक्यता आहे. खासदार ओमराजे निंबाळकर: ठाकरे गटातून शिंदे गटात आलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची जोरदार चर्चा आहे. प्रतापराव जाधव: विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्याकडील ‘आरोग्य राज्यमंत्रिपद’ काढून ते शिवसेनेच्याच नव्या खासदाराला दिले जाऊ शकते, मात्र त्यांचे ‘आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार’ कायम राहू शकतो. दुसरीकडे, उबाठा गटातून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचेही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, मुंबईत पत्रकारांना केलेली जाहीर अश्लील शिवीगाळ आणि धमकीमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. हायकमांड त्यांच्या या वर्तनामुळे प्रचंड नाराज असल्याने त्यांची संधी हुकल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचा ‘कॅबिनेट’चा तिढा सुटणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदाची ऑफर देण्यात आली होती, जी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या अनुभवाचा विचार करून राष्ट्रवादीने नाकारल्याची चर्चा होती. या विस्तारात राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद दिले जाण्याची चिन्हे असून, यासाठी प्रफुल्ल पटेल यांचे नाव निश्चित मानले जात आहे. भाजपमधील मोठे फेरबदल: कोणाची गच्छंती, कोणाला संधी? केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपच्या गोटातही मोठ्या खांदेपालटाची तयारी सुरू आहे: संभाव्य गच्छंतीमध्ये धर्मेंद्र प्रधान (केंद्रीय शिक्षण मंत्री) यांच्यावर ‘NEET’ पेपर लीक वादामुळे त्यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून सुट्टी होऊ शकते. तर हरदीप सिंह पुरी (पेट्रोलियम मंत्री) यांना मंत्रिमंडळातून वगळून पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. नवीन चेहरे आणि बढती ‘एक व्यक्ती-एक पद’ आणि इतर बदल: अल्पसंख्याक कार्य राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांचा राज्यसभा कार्यकाळ संपल्याने ते राज्याच्या राजकारणात सक्रिय होतील. ‘एक व्यक्ती-एक पद’ सूत्रानुसार, हर्ष मल्होत्रा (दिल्ली भाजप अध्यक्ष) आणि पंकज चौधरी (उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष) यांना मंत्रिपद सोडावे लागू शकते. फेरबदलामागील ‘3’ मोठी राजकीय समीकरणे गेल्या अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ३३ विरोधी खासदारांनी एनडीएमध्ये (NDA) प्रवेश केला आहे. या सर्व नवीन सहयोगी पक्षांना सरकारमध्ये सामावून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 1. आम आदमी पक्ष (AAP): २४ एप्रिल रोजी राघव चड्ढा यांच्यासह ‘आप’च्या ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2. तृणमूल काँग्रेस (TMC): १५ जून रोजी टीएमसीच्या २० खासदारांनी एनडीएला पाठिंबा दिला. 3. शिवसेना : उद्धव ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले. दोन-तृतीयांश बहुमताचे लक्ष्य भविष्यातील काही महत्त्वाच्या घटनात्मक दुरुस्त्यांसाठी संसदेत दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असल्याने, नवीन सहयोगी खासदारांना खूश ठेवणे भाजपसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच, आगामी उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक व सामाजिक समीकरणांचा समतोल साधला जाईल.
Source link
शिवसेनेला केंद्रात 3 मंत्रिपदे?:श्रीकांत शिंदेंसह ओमराजे निंबाळकरांच्या नावाची चर्चा, एकनाथ शिंदे आजच दिल्लीत जाण्याची शक्यता