Headlines

शेतकऱ्यांची माफी मागा:अन्यथा सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही




एकवेळ शेतकऱ्यांना वीज कमी पडली तर आम्ही सहन करू पण उद्योजकांना वीज कमी पडू देऊ नका, असे वक्तव्य करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संगम येथे घोषणाबाजी करत जाहीर निषेध करण्यात आला. संगम (ता. माळशिरस) येथे गुरुवारी सकाळी हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील राजीनामा द्या” अशी घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी दिला. बळीराजाचा अपमान सहन करणार नाही, शेतकरीविरोधी भूमिका सुरूच राहिली तर जनता सत्तेचा अहंकार उतरवेल आणि पुन्हा एकदा पानटपरीवर गुलाबराव पाटील यांना बसण्याची वेळ जनता आणेल. आंदोलनादरम्यान प्रशांत पराडे, ओम पराडे, विकास भोई, सचिन इंगळे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *