Headlines

शेवगावला दुष्काळाच्या झळा:पाणी, चारा अन् पिकांसाठी तातडीच्या मदतीची मागणी, पाऊस गायब झाल्याने जलस्रोत आटले; खरीप पिके करपली‎




पावसाने पाठ फिरवल्याने शेवगाव तालुक्यात दुष्काळाचे संकट अधिकच गडद झाले आहे. विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोत आटल्याने अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. दुसरीकडे बाजरी, कापूस, सोयाबीनसह खरीप पिके पावसाअभावी करपली असून शेतकऱ्यांसमोर उभे पीक वाचविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. चारा-पाण्याअभावी पशुधन जगविण्याचीही वेळ आल्याने शेवगाव तालुका तीव्र दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीने जोर धरला आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी सभापती क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. खरीप पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पीकविमा संरक्षण द्यावे. सन २०२४-२५ मधील रब्बी पीकविमा, चालू वर्षाचे सरसकट दुष्काळी अनुदान आणि खरीप पीकविमा तातडीने वितरित करावा. कृषी पंपांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरच्या फेऱ्या वाढवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, तसेच चाऱ्याचे वाढलेले दर लक्षात घेऊन शासकीय चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. दुष्काळाचे संकट अधिक तीव्र होण्यापूर्वी शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकरी, पशुधन आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. यावेळी निवेदनावेळी काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, पंडित भोसले, ताहेर पटेल, हनुमान पातकळ, नाना पाटील मडके, डॉ. सुधाकर लांडे, भारत मोटकर, अशोकराव मेरड, विजय पोटफोडे, प्रदीप काळे, संतोष पावसे, गंगाधर चोपडे, रामनाथ राजपुरे, अशोकराव धस, मिलिंद कुलकर्णी, गोरक्ष भेंडेकर, जमीर पटेल, राजेंद्र तांबे, प्रवीण मरकड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. ३४ गावांची आणेवारी कमी करण्याची मागणी पूर्व भागातील निंबेनांदूर, वाघोली, वडुले खुर्द, ढोरजळगाव, गरडवाडी, दिंडेवाडी, आव्हाने, ब-हानपूर, मळेगाव, सामानगाव, आपेगाव, आखातवाडे, भातकुडगाव, वडुले बुद्रुक, लोळेगाव, अमरापूर, फलकेवाडी, वरूर आदी गावांना तातडीने पाटाचे पाणी सोडावे. तसेच पूर्व भागातील ३४ खरीप गावांची आणेवारी कमी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *