Headlines

शेवगावात मावा अड्ड्यावर छापा:18लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त




शेवगाव येथील कोरडे वस्ती परिसरात मावा तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने २८ ऑगस्ट रोजी छापा टाकला. यात मावा बनवण्याची इलेक्ट्रिक मशीन, सुगंधीत तंबाखू, ८० किलो तयार मावा, सुपारीचा चुरा आणि दोन कार असा १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी मशीनवर मावा तयार करताना वसीम सत्तार तांबोळी (वय ३८, मूळ रा. श्रीरामपूर, हल्ली रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव) आणि शाहरूख उर्फ जावेद सलीम शेख (वय २७, रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर या दोघांकडून मावा बनवून घेणारा मुख्य सूत्रधार आसिफ तांबोळी हा पसार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *