Headlines

श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मास कार्यक्रमांची सांगता:यज्ञाने समारोप, पाऊस व शांततेसाठी प्रार्थना; महिनाभर विविध उपक्रम




सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित महिनाभराच्या विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची नुकतीच यज्ञाने सांगता झाली. या समारोपावेळी सर्वदूर चांगला पाऊस पडावा आणि जगात शांतता नांदावी, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली आहे. या उपक्रमांचे संयोजन ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल आणि डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी केले. यावेळी विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, रमेश पटोदिया, मुरलीधर चौधरी यांच्यासह पदाधिकारी व मंदिराचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमांची सुरुवात मागील महिन्यात कमल पुष्प अर्चना आणि विष्णू यागाने झाली होती. महिनाभरात डॉ. भावार्थ देखणे यांचे प्रवचन, मीनू पोतदार यांचे सुंदरकांड सादरीकरण, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. डॉ. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन यांसारखे धार्मिक कार्यक्रम झाले. याशिवाय, श्री सूक्त हवन, सुवर्ण कमल रजत कमल अर्चना, सहस्त्र बेल पत्र अर्चना, तुळशी अर्चना, पुष्प अर्चना, दीप उत्सव असे विविध धार्मिक विधी पार पडले. संतोषी मुंदडा व ग्रुपचे भजन, प्रिया डिसा व ग्रुपचा गरबा, गीता परिवारातर्फे विष्णू सहस्त्रनाम सामूहिक पठण व आरती, ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नम:’ चे सामूहिक पठण आणि श्री सूक्त सामूहिक पठण यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचाही यात समावेश होता. सामाजिक उपक्रमांमध्ये पुस्तक तुला, गो माता अन्नकोट, झुला उत्सव आणि धान्य तुला दान याचे आयोजन करण्यात आले होते. होम पूर्णाहुतीने या सर्व उपक्रमांची सांगता झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *