Headlines

श्री शिवाजी महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील अभिवादन कार्यक्रम:भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन




प्रतिनिधी | अकोला श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. आशिष राऊत, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणेश गायकवाड, प्रबंधक राजेश गीते, प्रशांत उमाळे, वर्षा धोत्रे, महेंद्र ठाकरे, रोहन बुंदेले आदी उपस्थित होते. गजानन पुंडकर म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रोहन बुंदेले यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *