Headlines

संजय शिरसाट अन् रायगडचे नेते महायुतीत मीठाचा खडा टाकत आहेत:एकनाथ शिंदेंनी त्यांना समज द्यावी, राष्ट्रवादीचा तिसरा गट होण्याचा संबंधच नाही- हसन मुश्रीफ




शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आणि रायगडमधील काही नेते महायुतीमध्ये मीठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. त्यांनी अशा प्रकारच्या कृत्यांपासून दूर राहिले पाहिजे आणि महायुतीमधील तिन्ही पक्षांनी याची दक्षता घेण्याची गरज आहे, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व आमदार एकसंघ असून, तिसरा गट स्थापन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, शिवसेनेचे संजय शिरसाट असोत किंवा रायगडमधील शिवसेनेचे काही नेते असोत, ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत. अतिशय भयानक आणि बिनबुडाचे आरोप त्यांच्याकडून केले जात आहेत. आमची जी समन्वय समिती आहे, त्यामध्ये महायुतीमधील तिन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका करू नये, असा सातत्याने सूर असतो. काही तक्रारी असल्यास त्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातल्या पाहिजेत; पण हे नेते त्यातून काहीही बोध घेत नाहीत. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांना विनंती करेन की, त्यांनी अशा नेत्यांना कडक शब्दांत समज दिली पाहिजे. सुनेत्रा पवार- शरद पवार निर्णय घेतील हसन मुश्रीफ म्हणाले की, काँग्रेसच्या लोकांनी काय बोलावे यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. अतुल लोंढे यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असून त्यात काहीही तथ्य नाही. विलीनीकरणासंदर्भात मला सविस्तर माहिती नाही, कारण आम्ही गोकुळ दूध संघ निवडणूक आणि दिवाळीमुळे कोल्हापुरातच होतो. या विषयावर सुनेत्रा पवार आणि शरद पवार जे ठरवतील, तोच अंतिम निर्णय असेल. दोन्ही नेते जो निर्णय घेतील, त्याच्या मागे संपूर्ण पक्ष भक्कमपणे उभा राहील. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले की, महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही त्यांना याविषयी कल्पना देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. आमच्या पक्षाला कमकुवत करण्याचा डाव हसन मुश्रीफ म्हणाले की, आमचे पक्षाचे नेते विमान अपघातात दुर्दैवाने गेले आहेत; त्यामुळे आम्हाला कसे कमकुवत करता येईल, असा डाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी सर्व निवडणुकांमध्ये अत्यंत चमकदार कामगिरी करू. विनाकारण आमच्या पक्षावर सातत्याने टीका करणाऱ्यांना माझी स्पष्ट सूचना आहे की, त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करून आमच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *