Headlines

संभाजीनगरमध्ये थंडीत वाढ, रात्रीचे तापमान 15.6 अंशांवर, आज धुके:पुढील आठवड्यात गारवा वाढण्याची शक्यता




शहरात आता थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी (१९ नोव्हेंबर) किमान तापमान १५.६ अंशांवर घसरल्याने वातावरणात गारवा जाणवला. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारी (२० नोव्हेंबर) सकाळी वातावरणात धुके राहणार आहे. काही दिवसांपासून सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत. कधी थंडी गायब होते, तर कधी तापमान १५ अंशांच्या आसपास येताच वातावरणात गारवा जाणवतो. बुधवारपासून किमान आणि कमाल तापमानात घट नोंदवण्यात येत असून गुरुवारीही तापमान घटण्याचे सत्र सुरू राहिले. पुढील आठवड्याच्या प्रारंभी किमान तापमानात काहीशी घट होऊन तापमान १४ ते १५ अंश सेल्सियसपर्यंत जाणार आहे. एक्स्पर्ट व्ह्यू: उत्तरेत थंडीची लाट आल्यास राज्यात गारठा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ओडिशाकडे सरकले. उत्तरेकडील काही भागांत हिमवृष्टी सुरू झाली आहे. तिकडे थंडीची लाट निर्माण झाली तरच थंडी वाढेल. – श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम विज्ञान केंद्र.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *