Headlines

संभाजीनगरमध्ये मराठा-राजभोग हॉटेलवर एफडीएची कारवाई:अस्वच्छतेमुळे परवाने निलंबित, स्वयंपाकघरात झुरळे; शाकाहारी, मांसाहारी पदार्थ एकत्र ठेवले




अन्न व औषधी प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने बजाजनगर येथील हॉटेल मराठा आणि वडगाव कोल्हाटी (महाराणा प्रताप चौक) येथील राजभोग हॉटेल या दोन आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित केल्याची माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली आहे. हॉटेल मराठाला ९८ पैकी ३३; तर राजभोग हॉटेलला ८८ पैकी अवघे १८ गुण मिळाल्याने ते एफडीएच्या तपासणीत अनुत्तीर्ण ठरले आहे. सहायक आयुक्त (अन्न) दयानंद पाटील यांनी अन्न सुरक्षा व मानके विनियम २०११ मधील तरतुदींनुसार निलंबनाचे आदेश जारी केले. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांनी ही पाहणी केली आहे. तक्रार करा, नाव गोपनीय ठेवणार : कोणत्याही हॉटेल, बेकरी, उपाहारगृह किंवा मिठाईच्या दुकानात अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न किंवा नियमभंग आढळल्यास नागरिकांनी थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. त्यासाठी थेट आमच्या कार्यालयात अथवा fda.maharashtra.gov.in पोर्टलवर ऑनलाइन तक्रार करावी, असे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांनी सांगितले. हॉटेल मराठा (बजाजनगर, वाळूज) ९८ पैकी केवळ ३३ गुण राजभोग हॉटेल (वडगाव कोल्हाटी) ८८ पैकी अवघे १८ गुण व्हॉट नेक्स्ट: त्रुटी दूर केल्यावर परवाना मिळेल हॉटेलचालकाला एफडीएने दर्शवलेल्या अस्वच्छता, पाणी चाचणी आणि पेस्ट कंट्रोलबाबतच्या सर्व त्रुटी आधी दूर कराव्या लागतील. त्यानंतर सुधारणा अहवाल सादर करून पुनर्तपासणीची विनंती करावी लागेल. एफडीए अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून समाधानी झाल्यास आणि लेखी परवानगी दिल्यावरच हे हॉटेल पुन्हा सुरू करता येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *